Crime News esakal
अहिल्यानगर

Crime News : फायनान्स कंपनीच्या दोन दलालांनी दुचाकी पळवली; जबरी चोरीचा गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

नेवासे फाटा : खासगी फायनान्स कंपनीच्या दोन दलालांनी दुचाकी पळवून नेल्याची फिर्याद नेवासे पोलिसांत दाखल झाली आहे. त्यानुसार नेवासे पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकास अटक केली असून, एक जण पसार झाला आहे.

दुचाकी वाहनजप्तीचा कुठलाही आदेश नसताना, बेकायदेशीरपणे घराच्या आवारातून धक्काबुक्की करून फायनान्स कंपनीच्या दलालांनी ज्युपिटर स्कूटी (एमएच १७ सीएम ८०६४) पळविल्याची फिर्याद शोभा पोपटराव नाईक (वय ४५, रा. सावतानगर, धंदा घरकाम) यांनी नेवासे पोलिसांत दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे, की मी पती पोपटराव व मुलगा संदीप यांच्यासह एकत्र राहते.

ज्युपिटर स्कूटी या दुचाकीसाठी आम्ही टीव्हीएस क्रेडिट सर्विस लिमिटेड या कंपनीचे कर्ज घेतलेले आहे. माझी स्कूटी घराच्या आवारात चावी लावलेली असताना, गुरुवारी (ता. १५) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास फायनान्स कंपनीच्या दोन व्यक्ती घराच्या आवारात समोरील दरवाजा उघडून आल्या.

एक व्यक्ती माझ्या गाडीवर बसून गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना मी समोरून आडवे होऊन गाडीचे हँडल पकडले व गाडी का घेऊन चाललात, असे विचारले असता, त्यावेळी प्रवीण आनंदराव शिंदे (रा. राहुरी, ता. जि. अहमदनगर) व गोपाळ गावडे (रा. झोपडी कँटीन, अहमदनगर) यांनी गाडीजप्तीचा कोणताही आदेश नसताना धक्काबुक्की, दमबाजी करून वरील वर्णनाची तीस हजार रुपये किमतीची, निळ्या रंगाची टीव्हीएस ज्युपिटर स्कूटी पळवून नेली.

फिर्यादीवरून नेवासे पोलिसांनी दोन दलालांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला अटक केली, तर दुसरा फरार होण्यात यशस्वी झाला आहे. अनेक खासगी फायनान्स कंपन्यांनी दादागिरी करणारे दलाल नेमून, न्यायालयाचा आदेश नसताना सर्रास नियमबाह्य गाड्या पळविण्याचा प्रकार चालविला असून, शोभा नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फायनान्स कंपनीच्या दोन दलालांविरुद्ध नेवासे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शेवटचा..., बूटफेकीच्या घटनेनंतर काय म्हणाले सरन्यायाधीश? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

Rahul Dravid Son: ४८ ब्राऊंड्री अन् ४५९ धावा... द्रविडच्या धाकट्या लेकाच्या कारनामा; KSCA कडून झाला मोठा सन्मान

पालघरमधील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर! डहाणूत सामान्य, जव्हारमध्ये सर्वसाधारण महिला तर पालघरमध्ये ओबीसीचे आरक्षण

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

SCROLL FOR NEXT