अहिल्यानगर

Ahmednagar: कुत्रा विकत घ्यायला आला अन् जाळ्यात अडकला ! ३३ लाखांचे दागिणे चोरणारा गजाआड, माणिकनगर चोरी प्रकरण

कोतवाली पोलिसांच्या हद्दीतील उच्चभ्रू वसाहत असलेल्या माणिकनगरमधील डॉ. ऋषभ फिरोदिया यांच्या घरी झालेल्या चोरीची उकल झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ahmednagar Crime: कोतवाली पोलिसांच्या हद्दीतील उच्चभ्रू वसाहत असलेल्या माणिकनगरमधील डॉ. ऋषभ फिरोदिया यांच्या घरी झालेल्या चोरीची उकल झाली आहे. चोरी करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नगर शहर, श्रीरामपूर, राहुरीतील सुमारे ७० ठिकाणचे दीडशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रीकरण तपासले.

त्यानंतर पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले. आरोपी कुत्रा विकत घेण्यासाठी एका ठिकाणी गेला होता आणि त्याचवेळी पोलिसांनी त्याला राहुरी बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले. चोरीला गेलेले ३३ लाख ५५ हजारांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

दीपक सर्जेराव पवार (वय ३२, रा. मल्हारवाडी रोड, राहुरी) असे आरोपीचे नाव असून, त्याला अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. डॉ. फिरोदिया यांच्या घरी २३ आणि २८ ऑक्टोबरच्या दरम्यान चोरी झाली होती. कपाटातील ५५ तोळे सोन्याचे दागिने, हिरे, पुष्कराज, मोती आणि पाचू असे दागिने चोरीला गेले होते.(Latest Marathi News)

याशिवाय एक घड्याळ आणि १७ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली होती. कोतवाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. ही चोरी पवार याने केल्याची माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलिसांच्या पथकाने आरोपीला बेड्या ठोकल्या. चोरीतील काही सोने सेलू (जि. परभणी) येथील दोन सराफांना विकाल्याचे आरोपीने सांगितल्यानंतर परभणी येथील सराफांच्या घरातून पोलिसांनी दागिने जप्त केले.

न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस अधीक्षक ओला यांनी गुन्ह्याची उकल करणाच्या पथकाला ३५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT