jalgaon crime esakal
अहिल्यानगर

Crime : करंजी घाटातील थांब्यावर बस थांबली अन् महिलेने गमावली तीन तोळे सोन्यासह रक्कम

रवींद्र देशमुख

अहमदनगर : एस. टी. बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील तीन तोळ्यांचे दागिने व रोख रक्कम, असा ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. शेवगाव ते अहमदनगर प्रवासादरम्यान ही चोरी झाली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभांगी प्रमोद डाके (वय ५०, रा. शेवगाव) या १६ मे रोजी सकाळी ११ वाजता अहमदनगरला येण्यासाठी शेवगाव- कल्याण बसमध्ये बसल्या होत्या. त्यांनी पर्समध्ये तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व सात हजार रुपये ठेवले होते. बस करंजी घाटात (ता. पाथर्डी) थांबली होती.

त्यावेळी पर्समध्ये दागिने व रोख रक्कम होती. त्या नगरमध्ये आल्यावर सावेडीतील गुलमोहर रस्ता भागात भावाच्या घरी रिक्षाने गेल्या. रिक्षाचे भाडे देण्यासाठी पर्स उघडल्यावर दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT