ahmednagar crime update in 10 months 32 vehicle theft case only 4 found  esakal
अहिल्यानगर

Ahmednagar Crime : दहा महिन्यात ३२ वाहनांची चोरी; फक्त चार दुचाकींचा पोलिसांकडून शोध

सातत्याने हद्दीतील गावांमधून दुचाकीसह चारचाकी वाहने चोरी गेल्याच्या घटना

सकाळ वृत्तसेवा

- राजू नरवडे

घारगाव : संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील ४६ गावांचा केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावांमधून दहा महिन्यांत २९ दुचाकीसह तीन मोठी वाहनाची चोरी झालेली आहे. वाहनांच्या चोरीबरोबरच इतरही चोऱ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. अनेक चोऱ्यांच्या फिर्यादी दाखल करण्यात आलेल्या आहे. मात्र अद्याप तपास सुरुच आहे.

पुणे व नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या मध्यभागी घारगाव येथे राष्ट्रीय महामार्गालगत घारगाव पोलिस ठाणे आहे. याच ठाण्याअंतर्गत एकूण ४६ गावे येत असून यामध्ये वाड्या-वस्त्यांचाही मोठा समावेश आहे. सातत्याने हद्दीतील गावांमधून दुचाकीसह चारचाकी वाहने चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

मात्र मागील दहा महिन्यांत चोरट्यांनी ३१ दुचाकी चोरून नेल्या होत्या. त्यापैकी चार दुचाकीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलेले असून उर्वरित चोऱ्यांचा तपास सुरुच आहे. दुचाकीबरोबरच पाच मोठी वाहनेही चोरून नेली होती. त्यापैकी दोन वाहने सापडले असून तीन वाहनांचा अद्यापही शोध लागला नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकही संतप्त झाले आहे.

दुचाकी चोरीबरोबरच शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीही चोरीच्या घटना घडलेल्या आहे. या चोऱ्यांचा शोध लावण्यात घारगाव पोलिसांना यश आले नाही.

घारगाव पोलिस ठाण्याअंतर्गत गावांसह वाड्या-वस्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच मनुष्यबळही खूप कमी आहे. ते वाढवून मिळावे म्हणून आम्ही वारंवार मागणी करत आहोत. मात्र अद्यापही मनुष्यबळ वाढवून मिळाले नाही. मनुष्यबळ वाढले की चोऱ्यांचे प्रमाणही कमी होईल.

- संतोष खेडकर, पोलिस निरीक्षक, घारगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT