SMAT 2026: सूर्यकुमार यादव यावेळी मात्र फसला; ललित यादवच्या वादळी खेळीने मुंबईला रडवले, पण तरी हरला गोवा संघ!

Mumbai Claims Hat-Trick of Wins in SMAT 2026: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बुधवारी मुंबईने गोव्याविरुद्ध रोमांचक विजय मिळवला. यासह मुंबईने या स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवला आहे.
Suryakumar Yadav | SMAT 2026

Suryakumar Yadav | SMAT 2026

Sakal

Updated on: 

Syed Mushtaq Ali Trophy 2026, Mumbai vs Goa: सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी २०२६ स्पर्धेत तिसऱ्या फेरीतील सामने बुधवारी होत आहेत. या फेरीत कोलकातामध्ये मुंबई विरुद्ध गोवा सामना पार पडला, ज्यात गोव्याला १८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील मुंबईच्या संघाचा हा सलग तिसरा विजय आहे. त्यामुळे मुंबईने डी गटातील आपले अव्वल स्थान आणखी भक्कम केले आहे.

या सामन्यात मुंबईने सर्वबाद होऊनही २०८ धावांचे मोठे लक्ष्य गोव्यासमोर ठेवण्यात यश मिळवले होते. पण गोव्याला १९ षटकात सर्वबाद १८९ धावाच करता आल्या. गोव्याकडून ललित यादवने वादळी अर्धशतक केले. त्याला दीपराज गोवनकरचीही साथ मिळाली होती. पण त्यांना संघाला विजयापर्यंत पोहचवता आले नाही.

Suryakumar Yadav | SMAT 2026
Syed Mushtaq Ali Trophy: संजू सॅमसनची तुफानी फटकेबाजी अन् मग निधीशच्या ५ विकेट्स; महाराष्ट्राचा केरळकडून दारुण पराभव!
Loading content, please wait...