ahmednagar crime update missing family mother son daughter found dead jamkhed police  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar Crime :सोमवारपासून तिघे जण होते बेपत्ता; जामखेड्यातील शेततळ्यात आईसह दोन बालकांचे आढळले मृतदेह

जामखेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली

सकाळ वृत्तसेवा

जामखेड : तालुक्यातील हाळगाव येथील एका शेततळ्यात महिलेसह तिच्या दोन बालकांचे मृतदेह आढळून आले आहेत. ही घटना बुधवारी (ता.१२) दुपारी उघडकीस आली. हे मायलेक सोमवारपासून बेपत्ता होते. याप्रकरणी जामखेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

चांदणी ऊर्फ उमा बबन पाचरणे (वय ३१), दीपाली बबन पाचारणे (वय ११) व राजवीर बबन पाचारणे (वय ८ वर्ष)  अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही सोमवारपासून (ता. १०) बेपत्ता होते. त्याबाबत जामखेड पोलिस ठाण्यात बबन पाचरणे यांनी तक्रार दिली होती.

बुधवारी हाळगाव येथील शेतकरी भीमराव महादू पिंपळे यांच्या गट क्रमांक ४३४  मधील शेततळ्यामध्ये एक महिला आणि दोन बालकांचे मृतदेह पाण्यामध्ये तरंगत असल्याचे आढळून आहे.

या प्रकाराची माहिती पोलिस पाटील सुरेश यशवंत ढवळे यांना दिली. त्यांनी जामखेड पोलिसांनी घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक महेश पाटील व सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून उत्तरीय तपासणी करण्यात आली.  या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : : खरीप हंगामात डीएपी या रासायनिक खताची टंचाई; पावसामुळे मशागतीची कामे ठप्प

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT