ahmednagar crime update  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar Crime : कामठीतील मुख्याध्यापकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

कामात अडथळा आणणाऱ्या महिलेविरोधातही गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : कामठी (ता. श्रीगोंदे) येथील एका विद्यालयाचे मुख्याध्यापक गुंगा जगन्नाथ आरडे यांच्या विरोधात एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला, तर त्याच महिलेविरुद्ध आरडे यांनी मारहाण केल्याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी फिर्याद दिल्यावर गुन्हा दाखल झाला. श्रीगोंदे पोलिसांनी दोन्ही गुन्हे दाखल केले.

सदर महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की ३ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजता आरोपी मुख्याध्यापक यांनी नरेंद्र महाराज विद्यालयात तिच्या पतीच्या जागेवर काम देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बोलाविले होते.

त्यावेळी आरोपीने फिर्यादीस वाईट शिवीगाळ करून, ''मी तुला तुझे पतीच्या जागेवर काम देणार नाही. तुला काय करायचे ते कर. तू येथे थांबू नको'' असे म्हणत हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

तू परत येथे आली तर तुझा बेत पाहतो, असे म्हणून जिवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, गुंगा आरडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते मुख्याध्यापक असून, विद्यालयात शासकीय कामकाज करत असताना यातील आरोपी महिलेने कार्यालयात येऊन मोठ्या आवाजात शिवीगाळ करीत, '

'माझे पती मृत झाले तरीसुद्धा तुम्ही अंत्यविधीला आले नाही,'' असे म्हणून गचांडी धरून चापटीने मारहाण केली. कार्यालयाच्या टेबलवरच्या शासकीय फायली फाडतानाच, टेबलवरील काच फोडून कार्यालयीन साहित्याचे नुकसान केले.

मी उद्यापासून शाळा चालू देणार नाही, तुम्ही शाळा कशी चालू करता तेच पाहते व मीच पोलिस ठाण्यात जाऊन तुमच्याविरुद्ध खोटी केस करते, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून पोलिसांनी सदर महिलेविरुद्धही सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : एल्फिन्स्टन ब्रिज परिसर जलमय, सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT