Vengurla Gold Jewellery Theft : हिरेजडित सोन्याच्या अर्धा किलो दागिन्यांवर डल्ला दाभोली-मोबारवाडीत बंद घर फोडले सुमारे अर्धा कोटीचा ऐवज; भागात खळबळ

Locker Stolen From Closed House in Dabholi-Mobarwadi : वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली-मोबारवाडी येथील बंद घरातून ५१५ ग्रॅम सोन्याचे व हिरेजडित दागिने असलेले लॉकर चोरीला गेले.
Vengurla Gold Jewellery Theft

Vengurla Gold Jewellery Theft

esakal

Updated on: 

वेंगुर्ले : दाभोली-मोबारवाडी येथील घरातून तब्बल अर्धा किलो (५१५ ग्रॅम) सोने व हिऱ्यांचे दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत ५१ लाखांपुढे जात असली तरी पोलिसांकडे १९ लाख ७२ हजार रुपये अशीच नोंद आहे.

ड्रेसिंग रूममध्ये कपड्यांच्या मागे लाकडी बॉक्समधील रॅकमध्ये ठेवलेले लॉकरच चोरट्याने चोरून नेले. या लॉकरमध्ये सुमारे ५१.५ तोळ्यांचे दागिने होते. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सलोनी सुधीर लोलयेकर (वय ७२, मूळ रा. दाभोली-मोबारवाडी, ता. वेंगुर्ला, सध्या रा. अंधेरी पश्चिम, मुंबई) यांनी येथील फिर्याद दिली आहे.

Vengurla Gold Jewellery Theft
Electricity Shock : हायव्होल्टेज तारेला स्पर्श; १३ वर्षीय मुलाचा हात निकामी, दोन्ही पाय, पोट व गुप्तांगालाही गंभीर दुखापत

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः १८ जून दुपारी साडेबारा ते २१ सप्टेंबर सकाळी सहापर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडला आहे. लोलयेकर मुंबई येथे गेल्या असताना त्यांच्या दाभोली-मोबारवाडी येथील घरात ही चोरी झाली. चोरट्याने ड्रेसिंग रूममधील कपड्यांच्या मागे लाकडी बॉक्सच्या रॅकमध्ये अमेझॉन लॉकर ठेवण्यात आले होते.

लॉकरमध्ये सोन्याचे तसेच हिरेजडित दागिने होते. लोलयेकर मुंबईहून परतल्यानंतर घरातील लॉकर व त्यामधील दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस उपनिरीक्षक योगेश कांबळे तपास करीत आहेत. चोरीच्या प्रकारामागे अनेक शक्यता लोलयेकर यांचे घर मोबारवाडी वस्तीत असून, एका बाजूला असल्याने तुलनेने कमी वर्दळ असते.

Vengurla Gold Jewellery Theft
Megablock: रविवारी प्रवाशांचे हाल होणार! सर्व रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; लोकलच्या वेळापत्रकात बदल; पाहा वेळापत्रक

वृद्ध महिला व कुटुंबीय मुंबई येथे ये-जा करीत असल्याने घर काही काळ बंद असते. याचा फायदा चोरट्याने घेतल्याची शक्यता आहे. परिसरात सीसीटीव्ही नसल्याने चोरट्याची हालचाल किंवा घरात प्रवेश करण्याचा मार्ग शोधणे पोलिसांसाठी आव्हानात्मक आहे. घराला कोणतीही तोडफोड झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे चोरट्याने घरात नेमका प्रवेश कसा केला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com