ahmednagar crime update son beat mother father agriculture police  Sakal
अहिल्यानगर

Ahmednagar Crime : ज्याला जन्म दिला, पोटाला चिमटे घेऊन लाडात वाढविले, त्यानेच केली लाथाबुक्क्यांनी मारहाण

जातप येथील घटना ;आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : ज्याला जन्म दिला, पोटाला चिमटे घेऊन लाडात वाढविले, त्यानेच वृद्ध माता-पित्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. गंभीर जखमी माता-पित्यांवर नगर येथे उपचार घेण्याची वेळ आली. ‘मुलगा ना तू वैरी...’ असे म्हणण्याची दुर्दैवी वेळ जन्मदात्यांवर आली.

जातप (ता. राहुरी) येथे वरील प्रकार घडला. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात आईने मुलाविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी संतोष मुरलीधर मुसमाडे (रा. जातप, ता. राहुरी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जमुना मुरलीधर मुसमाडे (वय ६५, रा. जातप) यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की मोठा मुलगा संतोष कुटुंबासह शेजारी स्वतंत्र राहतो. २४ जून रोजी दुपारी १२ वाजता घरासमोर उभी असताना संतोष दारू पिऊन आला. ‘तुम्ही माझ्या पिकाला पाणी का दिले नाही? तुम्ही पाणी न दिल्याने शेतातील पीक वाळून गेले आहे,’ असे म्हणाला.

त्यावर त्याला, ‘आमचे वय झाले आहे. तुझी शेती तू पाहून घे,’ असे म्हटल्याचा राग आला. त्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. पती सोडविण्यासाठी आले. त्यांनाही शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. पती गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर नगर येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चलो मुंबई! शेवटची फाइट, गुलाल उधळूनच परतायचं; जरांगेंचा सरकारला इशारा, २९ ऑगस्टला कसं असेल नियोजन

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! बटाट्यासह शिजवलेला बेडूक, भातात किडे, कडू चपात्या अन्...; वसतिगृहातील मेनू पाहून बसेल धक्का

Trending News : AI ची कमाल ! महिलेला मिळाला २५ वर्षांपूर्वी गेलेला आवाज, नेमका कसा घडला चमत्कार?

Latest Marathi News Updates : गणेशोत्सव समन्वय समितीची पालिकेकडे मागणी

Joint Pain: पावसाळ्यात सांधेदुखी का वाढते? जाणून घ्या उपचार कसे करावे

SCROLL FOR NEXT