Women save two youngster 
अहिल्यानगर

कितीही कौतुक केलं तरी कमीच! ताराबाईंनी अंगावरच्या साडीची केली दोरी अन् 2 तरुणांना वाचवलं

Tarabai Women save two youngster life using her sarre: दारणा धरण क्षेत्रात झालेल्या संततधारेने धरण ऐंशी टक्क्यांहून अधिक भरले आहे. त्यामुळे हळूहळू विसर्ग वाढविण्यात आला आणि गोदावरी नदी दुथडी भरून वाहती झाली.

कार्तिक पुजारी

अहमदनगर- तीन तरुण गोदावरी नदी पात्रात बुडत असताना परिसरात शेळ्या चारणाऱ्या ताराबाई नामक महिलेने प्रसंगावधान दाखवत अंगावरील साडी काढून नदी पात्रात फेकली आणि दोघांचे प्राण वाचवले आहेत. ताराबाईने दाखवलेल्या या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मात्र या घटनेत दुर्दैवाने एका तरुणाला वाचवण्यात अपयश आलंय.

दारणा धरण क्षेत्रात झालेल्या संततधारेने धरण ऐंशी टक्क्यांहून अधिक भरले आहे. त्यामुळे हळूहळू विसर्ग वाढविण्यात आला आणि गोदावरी नदी दुथडी भरून वाहती झाली. परिणामी नदीच्या काठावर असलेल्या विद्युत मोटारी सुरक्षित काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली.. कोपरगाव तालुक्यातील तरुण शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे, प्रदीप भीमाशंकर तांगतोडे आणि अमोल भीमाशंकर तांगतोडे हे तिघे भावंडे नदीतील मोटारी काढण्यासाठी मंजूर येथील गोदावरी नदीच्या पात्रात उतरले..

दुर्दैवाने पाणी वाढल्याने तीनही तरुण वाहत गेले. जवळच शेळ्या चारत असलेले मंजूर येथील रहिवासी ताराबाई छबूराव पवार आणि पती छबूराव बाबूराव पवार यांनी ही घटना पाहिली.. तीन तरुण वाहत जाताना दिसल्याने ताराबाई यांनी कोणताही विचार न करता तरुणांना वाचवण्यासाठी आपल्या अंगावरील साडीची दोरी बनवून पाण्यात फेकली आणि त्याआधारे तरुणांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

ही साडी जीवनाची दोरी बनून उपलब्ध झाल्याने प्रदीप तांगतोडे आणि अमोल तांगतोडे या दोघांचे प्राण वाचले मात्र त्यांचा बंधू संतोष भीमाशंकर तांगतोडे ( वय २५ ) हा नदीपात्रात बुडाला. दुर्दैवाने या घटनेत संतोष याचा मृत्यू झाला असून रेस्क्यू टीमच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मात्र ताराबाई पवार यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे प्रदिप आणि अमोल तांगतोडे या दोन तरुणांचे प्राण वाचल्याने ताराबाईच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Marathwada Vidarbha : बंडखोर खासदारांच्या मतदार संघात उद्धव ठाकरे शड्डू ठोकणार; मराठवाडा ते विदर्भ दौरा ठरला

Germany vs Ivory Coast: दोन गोल अपात्र ठरवले, तरी जर्मन्स नाही खचले; भरपाई वेळेत आयव्हरी कोस्टावर रोमहर्षक विजय

Maharashtra Politics: अमित शहांचं भाषण सुरू असताना पवनराजे निंबाळकर हत्येचा निकाल, एक फोन अन्‌ शिंदे ताडकन उठले

Father's Day Wishes in Marathi: "न बोलता प्रेम व्यक्त करणारा व्यक्ती म्हणजे बाबा!" फादर्स डे निमित्त बाबांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि प्रेमळ संदेश!

Arabian Sea Cyclonic Circulation : अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती, २५ जूनपासून पावसाला होणार सुरूवात; १ जुलैपासून मॉन्सून पूर्णपणे सक्रिय

SCROLL FOR NEXT