ahmednagar sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : ओढे-नाल्यांवर पुन्हा वादंग;महासभेत नगरसेवकांकडून अधिकारी धारेवर; आज घेणार बैठक

दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरांत पाणी शिरले.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर - शहरातील ओढे-नाल्यांच्या मुद्द्यावरून आज (ता. २५) महासभेत चांगलेच वादंग झाले. नैसर्गिक ओढे बुजविल्याने शनिवारच्या पावसामुळे नागरिकांच्या घरांत पाणी शिरले होते. त्यामुळे ओढ्यांमध्ये टाकलेले पाइप तत्काळ काढून घ्यावेत, अशी मागणी संतप्त नगरसेवकांनी सभेत केली. या प्रश्नावर मंगळवारी (ता. २६) बैठक घेण्यात येणार आहे. तीत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे.

महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत विविध विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. याप्रसंगी उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त श्रीनिवास कुऱ्हे आदी उपस्थित होते. सभेच्या सुरवातीला विरोधी पक्षनेते संपत बारस्कर व नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी बोल्हेगाव उपनगरातील गणेशनगर चौकातील रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला. काम न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी नगरसेवकांनी केली.

त्याचबरोबर प्रभागातील रस्त्यांचे पॅचिंग तातडीने सुरू करण्याची मागणी संपत बारस्कर यांनी केली. नगरसेविका दीपाली बारस्कर यांनी सावेडी उपनगरातील ओढे-नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणांचा प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ओढे- नाल्यांवर अतिक्रमण झाले आहे.

काही ठिकाणी महापालिकेनेच पाइप टाकून ओढे बुजविले आहेत. हे पाइप काढून ओढे मोकळे करा, अशी मागणी दीपाली बारस्कर यांनी लावून धरली. त्यावर आठ दिवसांत कार्यवाही करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मात्र, ही कार्यवाही तत्काळ झाली पाहिजे, अशी मागणी दीपाली बारस्कर यांनी केली. त्यावर, याविषयी मंगळवारी बैठक घेण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. जुन्या वसंत टॉकीज चौकाचे (कै.) पै. शंकरराव घुले (अण्णा) नामकरण करण्याचा विषय वगळता विषय पत्रिकेवरील सर्व विषय सभेत मंजूर करण्यात आले

घरपट्टी माफ करा

दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरांत पाणी शिरले. काही वर्षांपूर्वी जी स्थिती होती, तीच आताही आहे. ओढे- नाल्यांवरील अतिक्रमणांच्या प्रश्नाकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. हा प्रश्न सुटेल तेव्हा सुटेल, परंतु तोपर्यंत ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांची घरपट्टी माफ करावी, अशी मागणी नगरसेवक योगिराज गाडे यांनी केली.

नागरिकांमुळेच तुम्ही आहात

शहरातील नागरिकांना नागरी सुविधा मिळतच नाहीत, उलट ओढे- नाल्यांमधील पाणी नागरिकांच्या घरांत शिरत आहे. तुम्ही नागरिकांच्या जिवावर जगता. ते कर भरतात म्हणूनच तुम्हाला पगार मिळतो. तरीदेखील तुम्ही त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करता, अशा शब्दांत नगरसेविका दीपाली बारस्कर यांनी अधिकाऱ्यांना सभेत सुनावले.

या विषयांना मंजुरी

रस्ते, चौकांचे नामकरण

ई-बससाठी प्रस्ताव

शब्दगंध साहित्य संमेलनास निधी

सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा

दफनभूमीसाठी जागा देणे

जैन सोशल फेडरेशनला जागेचा मालकी हक्क देणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT