पावसाची हजेरी sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी

मान्सूनपूर्व भागात पावासाने जिल्ह्यातील काही भागात हजेरी लावलेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : शहरासह जिल्ह्यात आज (शनिवारी) पावसाने हजेरी लावली. शहरात सायंकाळच्या सुमारास मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रात्री वातावरणात गारवा निर्माण झाला होता.मान्सूनपूर्व भागात पावासाने जिल्ह्यातील काही भागात हजेरी लावलेली आहे. दोन दिवसांपूर्वीच नगर शहरात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर गुरुवारी पावसाने शहरात विश्रांती घेतली. आज (ता. ११)ला शहरासह परिसरात पावसाने रिमझिम पावसाने हजेरी लावली. नगर तालुक्यातील काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

राहुरी तालुक्यात दुपारी चारच्या सुमारास सर्वदूर जोरदार पाऊस झाला. शेवगाव तालुक्यातही काही ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली. कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख, अंजनापूर, काकडी, मनेगाव, कोपरगाव शहरात दुपारी चारनंतर पाऊस झाला. संगमनेर व श्रीरामपूर तालुक्यातही पावसाने हजेरी लावली.

नगर तालुक्यातील जेऊर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसाने ओढेनाल्यांना पाणी वाहिले. तसेच नगर तालुक्यातील इतरही भागात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील काही भागातही कमी जास्त प्रमाणात पावासाने हजेरी लावली.

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

पावसाला सुरवात झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरिपाच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांची खरिपाच्या पेरणीसाठी लगबग सुरु होणार आहे. आगामी दोन ते तीन दिवसात पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून आता खरिपाच्या नियोजनाची तयारी सुरु झालेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT