Maharashtra Weather Forecast Rain Alert Sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : जिल्ह्यात पुन्हा सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस

जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

राहुरी विद्यापीठ : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असल्याची माहिती विद्यापिठाच्या प्रसारण केंद्राने दिली. दि. ८, ९ व १० मार्च रोजी सोसाट्याचा वारा व विजेच्या कडकडाटासह जिल्ह्यातील काही ठिकाणी विशेषतः शेवगाव, पार्थडी, कर्जत, जामखेड व श्रीगोंदा या तालुक्यामध्ये अतिशय हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ३०-४० किमी प्रति तास असण्याची शक्यता आहे.

Rain

पुढील २-३ दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान ३७ ते ३९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १५ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पावसाची शक्यता असल्याने काढणीला आलेल्या पिकाची काढणी करून घ्यावी तसेच काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी किंवा प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवावीत असा सल्ला विद्यापीठाच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा विभागाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, राज्यपाल रात्री अचानक गेले राज्याबाहेर; काँग्रेससमोर पेच?

Rajat Patidar: आरसीबी फायनलमध्ये! पाटीदारच्या 'त्या' एका निर्णयामुळे गुजरात टायटन्स भुईसपाट; नेमकं काय घडलं?

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

Vaibhav Sooryavanshi: 'नवा सिक्सर किंग...', गेलची आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या वैभवसाठी स्पेशल पोस्ट; काय म्हणाला एकदा पाहाच

भेदक नजर आणि गूढ व्यक्तिमत्त्व ! घबाडकुंड सिनेमात शशांक शेंडे दिसणार मांत्रिकाच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT