Diwali  sakal
अहिल्यानगर

Diwali : विद्यार्थ्यांकडून अनाथांची दिवाळी गोड

समता स्कूलच्या स्वाती कोयटेंचा पुढाकार; दोन लाखांची भेट

सतीश वैजापूरकर

शिर्डी : कोपरगाव येथील समता इंटरनॅशनल स्कूलच्या साडेसातशे विद्यार्थ्यांनी आपल्यातील हस्तकलेचा आविष्कार प्रकट केला. सुबक नक्षीकाम असलेल्या पणत्या, आकाशकंदिलांपासून मोहक चित्रांपर्यंत शेकडो वस्तू तयार केल्या. त्यातून मिळालेले दोन लाख रुपये शिर्डीतील साई आश्रया अनाथाश्रमास भेट दिले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा आणि त्यातून एका अनाथाश्रमातील अभागी जीवांची दिवाळी गोड करणारा हा आगळावेगळा उपक्रम शाळेच्या कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला.

याबाबत ‘सकाळ’शी बोलताना त्या म्हणाल्या, की शाळेत अभ्यासक्रमाबरोबरच कला-क्रीडा विभागालाही महत्त्व दिले जाते. शाळेत चार कलाशिक्षक आहेत. त्यांचे मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि प्रेरणेतून विद्यार्थ्यांची सृजनशीलता फुलली. तब्बल साडेसातशे विद्यार्थ्यांनी दिवाळी सणाकरिता शेकडो कलात्मक वस्तू तयार केल्या. पाहताक्षणी मन आनंदी होईल अशा वस्तूंचे प्रदर्शन पाहून पालक, ग्राहक अक्षरशः भारावून गेले. एका दिवसात सर्व वस्तूंची विक्री झाली व मुलांवर कौतुकाचा वर्षाव झाला. मोबाईलच्या व्यसनाने सर्वांनाच ग्रासले, त्यातून मुलांच्या नैसर्गिक सृजनशीलतेवर प्रतिकूल परिणाम होत असताना, आमच्या शाळेतील मुलांनी प्रकट केलेला हा कलाविष्कार डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.

विभावरी नगरकर, प्रियांका नरोडे, शुभम बडगुजर, मेघना केकाण आणि कोमल ठोंबरे या कलाशिक्षकांनी, तसेच प्राचार्य समीर अत्तार यांनी त्यासाठी परिश्रम घेतले. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. दत्तात्रय मुळे, आयुर्वेदाचार्य डॉ. रामदास आव्हाड, होमिओपॅथीतज्ज्ञ डॉ. राजेश श्रीमाळी, सुहासिनी कोयटे आणि शाळेचे मुख्य कार्यवाह संदीप कोयटे यांच्या उपस्थितीत प्रदर्शनास प्रारंभ झाला. अवघ्या एका दिवसात सर्व वस्तूंची विक्री झाली.

भुमिदाने होसी भूमिपाळू । कनकदाने कांति निर्मळू ।

चंदनदाने सदा शीतळु । जन्मोजन्मी । प्राणिया ।।

संत नामदेव महाराजांनी दानाचे महत्त्व आपल्या अभंगात अत्यंत समर्पक शब्दांत वर्णिले आहे. भुमिदान, सोन्याच्या दानाचे महत्त्व त्यांनी विषद केले आहे.

समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा हा उपक्रम सर्वत्र चर्चेचा आणि कौतुकाचा ठरला. विद्यार्थ्यांना कलाविष्काराबरोबरच व्यवहारज्ञानाचा अनुभव मिळाला. त्यातून मिळालेले दोन लाख रुपये साई आश्रया अनाथाश्रमास भेट देण्यात आल्याने, सामाजिक बांधिलकीचा संदेशदेखील गेला.

- स्वाती कोयटे, कार्यकारी विश्वस्त, समता इंटरनॅशनल स्कूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस की भाजप? अरविंद केजरीवाल यांच्या तुरुंगातून बाहेर येण्याचा राजकीय फायदा कुणाला?

Pimpri Chinchwad Crime : काळेवाडीतील लकी बेकरी चौकात पैशांच्या कारणावरून तरुणाचा खून

T20 WC: भारत जिंकतोय खरा, पण...! अनिल कुंबळे, फॅफ ड्यू प्लेसिस यांनी व्यक्त केली चिंता; वेस्ट इंडिजविरुद्ध ही उणीव पडणार महागात

Aurangzeb Daughters : औरंगजेबाने कधीच स्वतःच्या मुलींचे लग्न का केले नाही? कारण वाचून अंगावर येईल काटा, हा क्रूर इतिहास ठेवलेला दडवून

SEBI on Gold : सोन्याच्या दराबाबत सेबीचा मोठा निर्णय! 1 एप्रिलपासून लागू होणार नवीन नियम

SCROLL FOR NEXT