डॉ.आंबेडकर sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : डॉ.आंबेडकरांचे विचार घराघरांत पोचवा

गडाख; नेवाशात डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात

राजेश नागरे

नेवासे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजातील सर्वचविचार प्रवाहांना समजून घेण्याची आवश्यकता आहे. हे विचार घराघरांत पोचविले पाहिजेत, असे आवाहन जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी केले. नेवासे शहर, पंचायत समिती, नगरपंचायत, तसेच तालुक्यातील कुकाण्यासह विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी गडाख यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

गडाख म्हणाले, की तरुण पिढीला डॉ. आंबेडकरांचे विचार समजून घेतल्याशिवाय आधुनिक भारताची सामाजिक जडणघडण कळणार नाही. लोकशाही समाजाची आणि सार्वभौम राष्ट्राची पेरणी करणारा क्रांतिकारक विचारवंत म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि कार्याकडे पाहिले पाहिजे.

यावेळी सभापती रावसाहेब कांगुणे, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप, मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, ॲड. देसाई देशमुख, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल अभंग, सरपंच सतीश निपुंगे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विलास देशमुख, काँग्रेसचे रंजन जाधव, दौलत देशमुख, एकनाथ कावरे, नितीन मिरपगार, गणपत मोरे, कारभारी गोर्डे, स्वप्नील गोर्डे, बंटी खंडागळे, परीक्षित गोर्डे आदी उपस्थित होते.

तालुक्यात विविध ठिकाणी जयंती साजरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोनई येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, यश ॲकॅडमी, किड्स किंग्डम इंग्लिश मीडियम स्कूल, भेंडे येथील जिजामाता विद्यालय व महाविद्यालय, बेल्हेकर शिक्षण संस्था, कुकाणे विद्यालय, दीनमित्र मुकुंदराव पाटील विद्यालयासह सर्व ग्रामपंचायतींत साजरी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Candidates List: भाजपची मोठी स्ट्रॅटेजी मीटिंग! विधान परिषदेच्या 6 जागांसाठी 12 जणांची चढाओढ; कोण होणार फायनल? लिस्ट आली समोर

Nagpur News: काझीला अमेरिका, बेंगळुरूमधून फंडिंग?; एटीएसकडून होणार तपास; एनजीओच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी सुरू

शेवटी आई ती आईच! सहलीवरून परतलेल्या लेकीला घ्यायला एअरपोर्टवर पोहोचली ऐश्वर्या, Viral Video

Latest Marathi News Live Update : गोकुळ निवडणुकीवरून महायुतीत वादाची ठिणगी, आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं

राज्यात ४८ तास धोक्याचे! मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यासह विदर्भावर वादळी पावसाचं संकट; १७ जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT