Election
Election esakal
अहमदनगर

अहमदनगर : निवडणुकांनी राजकीय क्षेत्र ढवळले

मुरलीधर कराळे

शिवसेना- राष्ट्रवादीचे तुणतुणे ; कॉँग्रेसचे वेट अॅण्ड वॉच :मनसे, रिपाइं चिडीचूप

अहमदनगर : राजकीय क्षेत्र कोरोनामुळे (corona)गेल्या दोन वर्षांपासून काहीसे शांत होते. तथापि, गेल्या वर्षभरात निवडणुका होऊ शकल्याने राजकीय ढवळाढवळ सुरू झाली. भाजपचे नेते अमित शहा(amit shah), नितीन गडकरी(nitin gadkari) यांच्या दौऱ्यांमुळे भाजपला(bjp) नवसंजीवनी मिळाली, तर शिवसेना- राष्ट्रवादीचे अंतर्गत तुणतुणे सुरूच राहिले. विशेष म्हणजे, बहुतेक ठिकाणी कॉँग्रेसने(congress) ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका निभावलेली दिसते. इतर पक्ष मात्र हाती सत्ता नसल्याने चिडीचूप आहेत.

जिल्हा बॅंक निवडणूक

जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीने(ditstrict co-opt bank election) राजकीय क्षेत्रात बहर आला. कोणी किती जागा घ्यायच्या, यावर खलबते झाली. कॉँग्रेसचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात(balasaheb thorat), राष्ट्रवादीचे नेते ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे(prajakt tanpur), माजी आमदार चंद्रशेखर घुले व भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्यात खलबते होऊन अखेर अॅड. उदय शेळके यांच्या गळ्यात बॅंकेच्या अध्यक्षपदाची माळ पडली. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका निर्णायक ठरली.

विधान परिषदेचे गाजर

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे शिवाजी कर्डिले व राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले यांनी जोरदार तयारी केली. त्याचाच भाग म्हणून संबंधित मतदारांना दिलेली दिवाळी फराळाची भेट विशेष चर्चेची ठरली. कर्डिलेंना भाजपमधून उमेदवारी न मिळाल्यास ते राष्ट्रवादीकडून लढतील, अशी शक्यता निर्माण झाली. हे वातावरण गरम होत असतानाच, पुरेशा संख्या बळाअभावी ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. लवकरच ही निवडणूक होणार आहे.

नगर अर्बन बॅंकेत एकहाती सत्ता

नगर अर्बन बॅंकेचा एनपीए वाढल्याने अडचणीत आलेल्या या बॅंकेची निवडणूक लागली. निवडणुकीत भाजपचे दिवंगत खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांच्या सहकार पॅनेलने एकहाती सत्ता मिळविली. बॅंक बचाव समितीचे नेते रिंगणात येण्याआधीच गळाले. त्यामुळे ही निवडणूक विशेष चर्चेची ठरली. नूतन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच, रिझर्व्ह बॅंकेने अनेक बंधने आणून विजयाची हवाच काढून घेतली.

पंचायत समित्यांचा नवा अध्याय

डिसेंबरमध्ये झालेल्या कर्जत, पारनेर व अकोले नगरपंचायतींच्या निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले. कर्जतमध्ये आमदार रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे यांच्यात वाक्‌युद्ध रंगले. या निवडणुकीच्या प्रचाराला गुजरातहून आलेले हार्दिक पटेल विशेष आकर्षण ठरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT