Ahmednagar  Esakal
अहिल्यानगर

Fake Marriage Certificate: झेरॉक्स दुकानात तयार करत होते बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र, नगरमध्ये दोघांना अटक

अहमदनगर शहरात झेरॉक्स दुकानातून बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या दोन जणाविरुद्ध शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ डिजिटल टीम

Fake Marriage Certificate Fraud Ahmednagar: अहमदनगर शहरात झेरॉक्स दुकानातून बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या दोन जणाविरुद्ध शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल तुळशीराम काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप कचरू राऊत (संकेत झेरॉक्स, रा. भगतसिंग चौक, शेवगाव), चैतन्य संतोष उन्हेघ (चैतन्य झेरॉक्स, रा. भडके मळा, शेवगाव) अशी आरोपींची नावे आहेत. डॉ. काळे यांच्या अधिपत्याखाली विवाह नोंदणी कक्षाचे कामकाज चालते.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे व लिपिक सदाशिव कराळे यांना विवाह नोंदणीचे काम पाहणाऱ्या महानंदा जाधव यांना शेवगाव येथे बनावट विवाह प्रमाणपत्र तयार करण्यात येत असल्याची माहिती दिली. जाधव यांना सी. ए. बालवीर मोहन परदेशी यांच्याकडून याबाबतची माहिती मिळाली होती. (Latest Marathi News)

त्यानंतर वरिष्ठाच्या आदेशाने जाधव यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात याबाबतचा तक्रार अर्ज दिला होता. त्यानुषंगाने चौकशीसाठी राऊत व उन्मेघ यांना ताब्यात घेतले असता, बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र देत असल्याचे समोर आले. त्यांनी असे प्रमाणपत्र देऊन शासनाची फसवणूक केली असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: 'नीट पेपर लीक' प्रकरणात सीबीआयकडून चार्जशीट दाखल; शिवराज मोटेगावकरसह 13 आरोपींचा समावेश

Pune Online Toy Car Scam: टॉय कारच्या ऑनलाइन खरेदीत शिवाजीनगरातील महिलेची पावणेचार लाखांची फसवणूक

Shraddha Chopde: 'ज्युदोच्या मॅट'वर शेतकरी कन्येचा सुवर्ण हुंकार! महाराष्ट्राची कन्या श्रद्धा चोपडे पदक जिंकण्यासाठी ग्लासगोला रवाना

Gang Rivalry Foiled: कृष्णा आंदेकरवरील गोळीबाराचा कट उधळला; नंदुरबारला जाताना पोलिस व्हॅनवर हल्ल्याची होती योजना

Shirur Temple Robbery: शिरूर जैन मंदिर दरोडा प्रकरणी तिघांना २५ महिन्यांचा कठोर कारावास; भाविकांत समाधान

SCROLL FOR NEXT