Ahmednagar sakal
अहिल्यानगर

Nagar : सततच्या पावसाने पिके पाण्याखाली; ऐन दिवाळीत शेतकरी चिंतेत-नगर

हवामान विभागाने आणखी पाच दिवस जिल्ह्यात पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जिल्ह्यात यंदा ६४९.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. हे प्रमाण सरासरीच्या १३५.५ टक्के एवढे आहे. हवामान विभागाने आणखी पाच दिवस जिल्ह्यात पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात यंदा रब्बीचा हंगाम येऊनही पाऊस थांबलेला नाही. पावसामुळे खरीप पिकांची काढणी थांबली आहे. पिके शेतातच खराब होऊ लागली आहेत. यात कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर, कांदा, पालेभाज्या, चारा पिके, फुले आदींचा समावेश आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रब्बीची पेरणी झालेली नाही. शेतात पाणी वाढल्याने शेतकऱ्यांत चिंता आहे. शहरी भागात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांत व सखल भागांत पाणी साचल्याने वाहतूक संथगतीने होत आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी निघालेल्या ग्राहकांनाही खरेदी करणे कठीण झाल्याने बाजारपेठेवर परिणाम होत आहे. फेरीवाले व रस्त्यावर बसून दिवाळीचे किरकोळ साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.

सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने दोन दिवसांपासून नदीला पूर येत आहे. सीना धरणातून सात हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या शिवाय भंडारदरा, निळवंडे, ओझर, घोड, जायकवाडी, मुळा या धरणातूनही पाणी सोडण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यांना पूर आले आहेत. शहरात सीना नदीला पूर आल्याने सायंकाळी दोन नद्यांच्या पुलावर पाणी आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाची वीज गायब

वीजपुरवठा खंडित झाल्याचा फटका जिल्हाधिकारी कार्यालयास बसला. या कार्यालयात दुपारनंतर वीजपुरवठा बंद झाल्याने कामकाज ठप्प झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीजपुरवठा दुपारी दीडनंतर ठप्प झाला. कार्यालयाच्या तळमजल्यातील पाणी उपसण्यासाठी विद्युत मोटारी बंद पडल्या. या ठिकाणी पाणी वाढू लागल्याने कर्मचाऱ्यांना वाहने बाहेर काढावी लागले. त्यासाठी धावपळ करावी लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT