अहमदनगर  sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : ‘झेडपी’च्या बाबूंना वाचनाचे वावडे

साडेचारशे कर्मचारी; लायब्ररीचे सभासद १२ जण

दौलत झावरे

अहमदनगर: जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढावी व त्यांच्या ज्ञानात भर पडावी, हा उदात्त होतू डोळ्यांसमोर ठेवून प्रशासनाने जिल्हा परिषदेत वाचनालय उभारलेले आहे. मात्र कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या वाचनाच्या उदासीनतेमुळे वाचनालय शोभेची वस्तू बनले आहे.

जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये वाचनाची संस्कृती जोपासण्यासाठी डिसेंबर २०१५ मध्ये वाचनालय उभारण्यात आलेले आहे. या वाचनालाचे उद्‍घाटन करण्यात आले आहे. ‘नव्याचे नऊ दिवस'' या म्हणी प्रमाणे या वाचनालयाला सुरवातीला कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. वाचकांची संख्या ९२ पर्यंत पोहचली. त्यानंतर मात्र कर्मचाऱ्यांनी या वाचनालयाकडे पाठ फिरविली. वाचनालयात सध्या ६६० पुस्तके आहेत. वाचकांचा प्रतिसाद मिळू लागल्याने वाचकांकडून ५०० रुपये अनामतच रक्कम घेण्यास सुरवात झाली. त्यामुळे वाचक संख्या घटली. आता केवळ १४ सभासद आहेत. त्यातील दोघांची बदली झाल्याने त्यांनीही सभासदत्व रद्द केले आहे. सध्या १२ सदस्य आहेत. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेत तब्बल ४५० कर्मचारी कार्यरत आहेत.

माजी राष्ट्रपती कै. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. हा दिन सर्व शाळांत साजरा करण्याच्या सूचनाही जिल्हा परिषद प्रशासनाकडून दिल्या जातात. मात्र दुसरीकडे कर्मचाऱ्यांनाच वाचनाचे वावडे असल्याचे दिसते. हे वाचनालय शोभेची वस्तू बनले आहे.

वाचनालयाची उभारणी ः डिसेंबर २०१५

उपलब्ध पुस्तके ः ६६०

वाचक संख्या ः १२

अनामत ः ५०० रुपये

अनामत परवडेना !

जिल्हा परिषदेच्या वाचलनायात पुस्तके वाचनासाठी ५०० रुपये अनामत घेण्यास सुरवात झाली. त्यामुळे अनेकांनी त्याकडे पाठ फिरविण्यास सुरवात केली आहे. सध्या १२ जण सभासद आहेत.

वाचनालय उभारले, तरतूद होईना

जिल्हा परिषदेत वाचनालय पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी सुरू केलेले आहे. मात्र त्यात पुस्तके वाढविण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेले आहे. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांना पुरस्तके अनेक भेट मिळत असतात. ते जरी या वाचनालयात ठेवले, तरी पुस्तकांची संख्या वाढण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! एसटीच्या जादा बसफेऱ्यांचे नियोजन; पाहा वेळापत्रक

Pune: मुलीला मिठी मारून विनयभंग करणाऱ्यास तीन वर्षे कारावास; जुन्नर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

Tea Dispute: भारताचा नेपाळला मोठा दणका! सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला; नव्या नियमांमुळे व्यापारावर परिणाम

Medha Kulkarni: ''मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पुढे बसू नका'', पुण्यात मेधा कुलकर्णींचा अपमान? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा, अभिमन्यू पवारांवर आरोप

Latest Marathi News Live Update : रानडुकराचा हल्यात जखमी झालेले गोविंद पिंजरकर यांची प्राणज्योत मावळली

SCROLL FOR NEXT