Garbage  
अहिल्यानगर

Ahmednagar : महामार्ग झालेत कचरा डेपो! रस्त्याने जाणाऱ्यांना सहन करावा लागतोय दुर्गंधीचा त्रास

सकाळ डिजिटल टीम

नगर तालुका : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर कचऱ्याचे ढिग साचले असू हा कचरा कुजून त्याची दुर्गंधी सुटली आहे. महापालिका, ग्रामपंचायत विभाग व आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याने एमआयडीसी परिसरातील मनमाड रस्ता, छत्रपती संभाजी नगर रस्त्यावर गजराज नगर परिसर, पाथर्डी रस्त्यावर सैनिक नगर परिसर, जामखेड रस्त्यावर हत्ती बारव परिसर, पुणे रस्त्यावर केडगाव बायपास परिसर, कल्याण रस्त्यावरील रेल्वे पूल परिसर, दौंड रस्त्यावरील आरणगाव परिसर, सोलापूर रस्त्यावर वाकोडी फाटा परिसरात आपल्याला कचऱ्याचे ढिग साचलेले पहावयास मिळतात.

महापालिका, कॅन्टोन्मेंट व ग्रामपंचायतींच्या हद्दीवर हे कचऱ्याचे ढिग साचले आहेत. हा कचरा कोणी उचलायचा हा मोठा प्रश्‍न आहे. महापालिकेला लगत असलेल्या पोखर्डी, नवनागापूर, बाराभाभळी, वाकोडी फाटा, दरेवाडी, केडगाव, आरणगाव या ग्रामपंचायती असून महापालिकेची नव्याने वसलेली उपनगरे आहेत.

यातील काहीजण तर चक्क आपल्या हद्दीत साचलेला कचरा या महामार्गा लगत आणून टाकतात. यात मोठ्या प्रणाणात प्लास्टीक, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, कोंबड्यांची पिसे. मासांची तुकडे या सह इतर कचऱ्यातून दुर्गंधी सुटते.

या संदर्भात महापालिका व कॅन्टोन्मेंट कडे संपर्क साधला असता आमची हद्द नाही असे सरळ त्तर दिले जाते. यातील काही सक्षम ग्रामपंचायतींकडे कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र वाहन व कर्मचारी व्यवस्था असूनही हे कचऱ्याच्या ढिगांचे कचरा डेपो होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT