Corona_Patients google
अहिल्यानगर

नगरला मिळाला सलग दुसऱ्या ३८ केएल अॉक्सीजन

दररोजची गरज आहे ६० केएलची

अशोक निंबाळकर

नगर ः जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी 38 केएल ऑक्‍सिजन उपलब्ध झाला आहे. ऑक्‍सिजनची गरज असलेल्या कोरोना रुग्णांसाठी ही बाब समाधानकारक आहे.

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय व खासगी रुग्णालयांना माफक प्रमाणात ऑक्‍सिजनचा पुरवठा होत आहे. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या 22 हजार 840 झाली आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांना श्‍वास घेण्यास त्रास होत आहे. अशा रुग्णांना ऑक्‍सिजनची गरज असते. जिल्ह्यातील ऑक्‍सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सुमारे 60 के.एल. ऑक्‍सिजनची गरज भासते.

जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी ऑक्‍सिजन मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसी, रायगड जिल्ह्यातील तळोजा एमआयडीसी, तसेच विशाखापट्टणम येथून विशेष रेल्वेने नगरला ऑक्‍सिजन मिळाला आहे. सोमवारी (ता. 26) चाकण एमआयडीसीतून 38 केएल ऑक्‍सिजन उपलब्ध झाल्याची माहिती नोडल अधिकारी तथा नायब तहसीलदार प्रशांत गोसावी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: रुपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा! राजीनाम्याचं कारणही सांगितलं

धर्मांतर कायद्यानंतर आता UCC! महाराष्ट्रात समान नागरी संहिता लागू करणार? विवाह, वारसा, घटस्फोट नियमांमध्ये होणार बदल

Ashok Kharat: ''अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार गंभीर...'', आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अमरावतीत स्वच्छतेचा बोजवारा; कंत्राटदार नियुक्तीच्या प्रक्रियेला खीळ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या तलवारी म्यान

Latest Marathi News Update: राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT