Farmer esakal
अहिल्यानगर

Ahmednagar : विमा कंपन्या तुपाशी अन् शेतकरी उपाशी नुकसान भरपाई रामभरोसे

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कुटुंब उद्वस्त झाले आहे

मनोज जोशी

कोपरगाव : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कुटुंब उद्वस्त झाले आहे. दुसरीकडे शासन व शेतकऱ्यांकडून विम्यापोटी घेतलेल्या हप्त्याच्या कोट्यावधी रकमेतून विमा कंपन्या तुपाशी तर शेतकरी उपाशी असल्याचे चित्र आहे. शासन सुद्धा या विमा कंपन्यासाठी काम करते कि काय अशी शंका येते. महसुली आकडेवाडीनुसार तालुक्यात तब्बल बत्तीस हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले.आजतागायत केवळ २३०० हेक्टरवरील पंचनामे करून एक कोटी रुपये रक्कम वर्ग केले.प्रति शेतकरी सरासरी ४३०० रुपये प्रमाणे विमा रक्कम आली.

तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला तर विमा कंपनीला ५२००० हेक्टरचे २८ कोटी रूपये देण्यास शासनाची तयारी असल्याचे सिद्ध होते. त्याऐवजी विमा कंपन्यांची झंझट मिटवून महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शेतकऱ्याला खरीप हंगाम संपताना प्रति हेक्टर ८००० रूपये सरसगट मदत देण्याची योजना राबवावी अशी मागणी येथील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी केली.

याबाबत मुख्यमंत्री यांना काळे यांनी पत्र देऊन शासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी म्हटले की, तालुक्यात १३ हजार शेतकऱ्यांनी प्रति हेक्टरी 8017 रुपयांचा विमा उतरवला आहे. अतिवृष्टी झाली तेव्हा विमा कंपनीचे सरव्हर बंद होते. विमा कंपनीने पंचमाने करण्यासाठी सहा कंत्राटी नेमले. ज्यांना शेतीचे ज्ञान नाही असे कर्मचारी पिकाचे पंचनामे करत नुकसान ठरवत आहे. ही जखमेवर मीठ चोळण्यासारखी बाब आहे.

कृषि अधिकारी पूर्ण नुकसान झालेचा असा अहवाल पाठवतात. ३२००० हेक्टर क्षेत्राचे नुकसान होऊन शासन नियमा प्रमाणे हे शेतकरी ८१ कोटी रूपये नुकसान भरपाईला पात्र आहेत. कृषि अधिकारी यांचे माहितीनुसार विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना ५२ कोटी रूपये विमा रक्कम मिळणे जरूरी आहे. पण विमा कंपनी फक्त तीन ते चार कोटी देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याच्या तयारीत दिसत आहे.

तेलंगणा राज्य सरकार तेथील शेतकऱ्यांना एकरी पाच हजार रुपयांची सरसगट मदत खात्यावर जमा करते. याच धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाने नुकसान भरपाई जमा करावी.

- संजय काळे, सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! तुमचा तालुका आहे का चेक करा... जिल्हानिहाय संपूर्ण यादी समोर

वानर थेट वाइन शॉपमध्ये घुसला; दारू प्यायली अन् पुढे जे घडलं ते पाहून लोकंही थक्क

Latest Marathi News Live Update : लालबागच्या राजाचं 24 तासांनंतर विसर्जन, भाविकांचे पाणावले डोळे; समुद्रकिनारी मोठी गर्दी

तेव्हा मी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होतो... अभिजीत सावंतचं मोठं विधान; म्हणतो- त्याला कुणी ओळखत नव्हतं

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

SCROLL FOR NEXT