Ahmednagar esakal
अहिल्यानगर

Ahmednagar: बेरोजगारीचा उच्चांक! कंत्राटी आरोग्यसेवेच्या भरतीसाठीही अर्जांचा पाऊस; आज मुलाखती

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर: जिल्ह्यात पावसाने दडी मारली असली, तरी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पदभरतीसाठी उमेदवारांच्या अर्जांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. विशेषतः नर्सच्या पदासाठी आलेल्या अर्जांची संख्या मोठी आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भरतीच नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढली होती. आता कंत्राटी भरती निघताच उमेदवारांची झुंबड उडाली आहे. तब्बल अकराशे अर्ज आले आहेत. एकंदरीत, लोकांना आरोग्यसेवा देण्यासाठी ही अहमहमिका लागली आहे.

यंदाच्या भरतीत हे चित्र असले तरी वरिष्ठ पदांच्या जागांकडे मात्र उमेदवार पाठ फिरवत असल्याचे वास्तव आहे. ग्रामीण भागात जाऊन तुटपुंज्या वेतनावर काम करण्यास एमबीबीएस डॉक्टर उत्सुक नसतात.

मागील काही भरतीत तसे निदर्शनास आले होते. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्थ ही कंत्राटी तत्त्वावर रिक्त पदे भरली जाणार आहेत.

जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी कंत्राटी पद्धती पदभरती केली जाणार आहे. अवघ्या २०९ जागांसाठी तब्बल हजाराहून अधिक अर्ज आले आहेत. मेडिकल ऑफिसर १८ (पुरुष),

तर महिलांसाठी २१ जागा आहेत. कर्जत, जामखेड, नगर, नेवासे, पारनेर आदी ठिकाणी काम करावे लागेल. स्टाफ नर्ससाठी सर्वाधिक ९७ जागा राखीव आहेत. कौन्सिलर, एक्स रे टेक्निशिअनच्याही जागा आहेत.

आज मुलाखती

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्थ ही कंत्राटी तत्त्वावरील रिक्त पदे भरली जाणार आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अमोल शिंदे हे संबंधित उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Politics News: राहुल गांधींना मोठा धक्का! काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि दिग्गज नेत्याचा पक्षाला रामराम; मनधरणीचा प्रयत्न होणार?

Mastani Descendants : मस्तानीचे वंशज आता कुठे आहेत? काय आहे त्यांची सध्याची अवस्था..पाहा इतिहासात खोल दडलेलं रहस्य

Ratha Saptami 2026: कुंडलीत सूर्यदोष आहे? तर रथ सप्तमीच्या दिवशी हा उपाय करायला चुकवू नका!

Gold and Silver Price : सोन्या-चांदीची ऐतिहासिक भरारी! सोन्याने गाठला दीड लाखाचा टप्पा, तर चांदी ३ लाखांच्या पार

T20 World Cup: बांगलादेशचा पत्ता कट झालाच! वर्ल्डकपमध्ये भारतात त्यांच्या जागी हा संघ खेळणार, ICC कडून शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT