nagar sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : ‘रंगारंग’नंतर महामार्ग अंधारात ; संगमनेरमध्ये पथदिव्यांचे दोनदा लोकार्पण

नियोजित उद्घाटनापूर्वीच स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी महाविद्यालयीन मुलींच्या हस्ते दुपारी उद्घाटन करुन कार्यक्रम हायजॅक करण्याचा प्रयत्न केला.

आनंद गायकवाड

संगमनेर - शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या नाशिक-पुणे राज्यमार्ग (क्रमांक ७१ अ) वरील दुभाजकांवरील पथदिव्यांचा शुभारंभ मंगळवार (ता. २६) भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षाकडून दोन वेळा करण्यात आला. हजारो संगमनेरकरांच्या आनंदोत्सवात झालेल्या रंगारंग कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसापासून हा राज्यमार्ग पुन्हा अंधारात बुडाल्याने शहरवासियांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या नाशिक-पुणे राज्यमार्गाच्या शहरातील बसस्थानक ते नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० या अंतरातील रस्ता दुभाजक व विद्युत पथदिव्यांसह चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ५ नोव्हेंबर २०२१ रोजी करण्यात आले. या कामासाठी केंद्रीय मार्ग निधी २ हजार ४५६ लाख व राज्य शासनाचा ७०० लाख अशा सुमारे ३ हजार १५६ लाख रुपयांच्या निधीतून इंडियन रोड काँग्रेसच्या मानकाप्रमाणे हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

सध्या शहरातील अकोले रोडपर्यंत हे काम आले आहे. दुभाजकावर लावलेल्या पथदिव्यांचे उद्घाटन करताना संगमनेरकरांना आनंदात सहभागी करुन घेण्यासाठी आमदार थोरातांच्या संकल्पनेतून हॅपी स्ट्रीट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २५ कोटी रुपयांचा निधी दिल्याचा उल्लेख आमदार थोरात यांनी अनेकदा करुनही, हे उद्घाटन श्रेयवादाच्या लढाईत अडकले.

नियोजित उद्घाटनापूर्वीच स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी महाविद्यालयीन मुलींच्या हस्ते दुपारी उद्घाटन करुन कार्यक्रम हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुमारे अडीच तास रास्तारोको आंदोलनही झाले. सायंकाळी कोसळत्या पावसात हजारो आबालवृद्ध, स्त्री पुरुषांनी मालपाणी उद्योग समूहाने प्रायोजित केलेल्या आयर्न गाला डीजे व इमॅजिका शोचा मनमुराद आनंद घेतला. मात्र दुसऱ्या दिवसापासून पथदिव्यांचे दिवे प्रकाशमान झालेच नाहीत. तब्बल आठ दिवसानंतरही हीच परिस्थिती कायम आहे.

वीज पुरवठा करणाऱ्या केबलमधील तांत्रिक अडचणीमुळे दिवे बंद आहेत. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, आगामी तीन ते चार दिवसात हे काम पूर्ण होईल. राज्यमार्ग हद्दीतील ग्रामपंचायती व नगरपरिषदेला पथदिवे हस्तांतरित करण्यात येणार आहे. पुढील वीजबिल व दुरुस्तीची जबाबदारी त्यांची आहे.

नीलेश बिराडे,

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

Baramati Bypoll News: बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी भाजपचा बूथस्तरावर निर्धार, विकासकामांवर भर

Nashik Dharmantar Case: नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करा; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पोलिसांना निर्देश!

SCROLL FOR NEXT