Ahmednagar Historical Museum will be open from Friday 
अहिल्यानगर

नगरचे ऐतिहासिक वस्तू संग्रहालय शुक्रवारपासून होणार खुले

अमित आवारी

नगर ः अहमदनगर ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय व संशोधन केंद्र शुक्रवारपासून (ता. 15) पर्यटकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. 

कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन त्यांनी सर्व पर्यटक, इतिहास अभ्यासक मंडळींना केले आहे. मार्च 2020 पासून कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे बंद असलेले संग्रहालय तब्बल 10 महिन्यांनंतर सर्वांसाठी खुले होणार आहे.

गुरुवारी संग्रहालयाला सुटी राहील. या खेरीज, रोज सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत ते खुले राहणार आहे. प्रौढांना 50 रुपये, तर विद्यार्थ्यांना 20 रुपये प्रवेश शुल्क असेल. फोटोग्राफी, विदेशी नागरिक, तसेच संशोधकांसाठी वेगळे शुल्क आकारण्यात येईल, अशी माहिती संग्रहालयाचे कार्यकारी विश्‍वस्त डॉ. रवींद्र साताळकर यांनी दिली. 

आहे काय संग्रहालयात

ऐतिहासिक संग्रहालयात दुर्मिळ ग्रंथ आहेत. काही शिवकाळातील हस्तलिखिते आहेत. पोथ्यांचाही संग्रह मोठ्या प्रमाणात आहे. स्वतंत्र क्वाईनचे दालन केले आहे. गणेशाचीही विविध प्रकारच्या मूर्ती आहेत. दायमाबाद, जोर्वे येथील उत्खननात सापडेल्या वस्तूही मांडल्या आहेत. निजामशाहीतील दस्तावेज, छत्रपतींच्या काळातील कागदपत्रे, वंशावळ येथे आहे.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: कात्रज-कोंढवा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

SCROLL FOR NEXT