Bharati Pawar Team eSakal
अहिल्यानगर

अहमदनगर: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार घटनास्थळी दाखल

अहमदनगरमध्ये जिल्हा रुग्णालयात आग लागल्यानं ११ रुग्णांचा मृत्यू झाला.

सुधीर काकडे

अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात आज सकाळी घडेलेल्या एका घटननेनं सध्या संपुर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या घटनेत आयसीयु विभागात लागलेल्या आगीत ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या गंभीर घटनेची दखल घेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार या सध्या अहमदनगरमधील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात आग (Ahemadnagar Fire) लागल्याची धक्कादायक घटना घडली. रुग्णालयाच्या कोविड विभागातील आयसीयुमध्ये उपचार घेत असलेल्या ११ रुग्णांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी असल्यानं मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

या घटनेनं आज अहमदनगर जिल्ह्यात शोककळा पसरली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या कुटुंबीयांना एकुण ७ लाखांची मदत मिळणार आहे. भारती पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. या घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची भेट घेतली. तसेच या प्रकरणावरून आपण केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी बातचीत केली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT