लोणीत साकारणार जंबो आयसीयू sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : लोणीत साकारणार जंबो आयसीयू

गौरंगदास प्रभूंच्या हस्ते भूमिपूजन; शंभर व्हेंटिलेटरचे लोकार्पण

राजेश नागरे

लोणी: प्रवरा मेडिकल ट्रस्ट व प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणाऱ्या राज्यातील सर्वांत मोठ्या आयसीयू सेंटरच्या भूमिपूजन कोनशिलेचे अनावरण व व्हेंटिलेटरचे लोकार्पण इस्कॉन गोवर्धन इकोव्हिलेजचे संचालक गौरंगदास प्रभू यांच्या हस्ते झाले.

लोणी येथील प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रमाला कुलपती डॉ. राजेंद्र विखे, गुगल इंडियाचे हेल्थ केअर विभागप्रमुख गुलजार आझाद, ट्रान्सट्रेडिया युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष उदित शेठ, गोवर्धन इकोव्हिलेजचे सोशल इनिशिएटिव्ह प्रमुख यचनित पुष्कर्णा,राज्यपालांचे विशेष कार्यकारी अधिकारी राकेश नैथानी, कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

गौरंगदास प्रभू म्हणाले, की शांती, समृद्धी व सुखाची गुरुकिल्ली ही गीतेत आहे. आज जग मानसिक विकारांनी ग्रासलेले आहे. त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. हे टाळायचे असेल, तर गीतेचा आधार घ्यावा लागेल. गीतेतील संस्कार मानसिक ताण-तणावातून मुक्तता देऊ शकतात. भारत सुपर पॉवर देश होण्यासाठी प्रवरा मॉडेल एक आदर्श उदाहरण आहे. विखे कुटुंबीयांकडून ग्रामीण भागातील गोरगरिबांचे शिक्षण आणि आरोग्यासाठी सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे. प्रवरा परिवार शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोचवत असल्याने समाधान वाटते.

प्रास्ताविक डॉ. अमित मनी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. दीपिका भालेराव यांनी केले, तर कर्नल डॉ. रवींद्र मणेरीकर यांनी आभार मानले. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, महंत उद्धव महाराज मंडलिक, प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या विश्वस्त सुवर्णा विखे, मोनिका सावंत, कल्याण आहेर पाटील, ध्रुव विखे, नंदकिशोर राठी, कैलास तांबे, डॉ. प्रमोद म्हस्के उपस्थित होते.

‘प्रवरा’ देशातील परिपूर्ण मॉडेल

खेड्यातील एका शेतकरी कुटुंबातील व्यक्तीने आपल्या दूरदृष्टीने आरोग्यसेवेचा संकल्प करीत हजारो डॉक्टर घडविले आहेत. ही देशातील एक मोठी क्रांतीच आहे. प्रवरा हे स्वतंत्र भारतातील सगळ्यांत परिपूर्ण मॉडेल असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख डॉ. गुलजार आझाद यांनी यावेळी केला.

लोणी प्रवरा मेडिकल ट्रस्ट व प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठातर्फे उभारण्यात येणाऱ्या आयसीयू सेंटरचे भूमिपूजन व व्हेंटिलेटरचे लोकार्पण करताना इस्कॅान गोवर्धन इकोव्हिलेजचे संचालक गौरंगदास प्रभू, कुलपती डॉ. राजेंद्र विखे आदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT