Ahmednagar  sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : शिक्षण विभागाला गळती

कार्यालयाच्या छतावर प्लॅस्टिक कागद अंथरुण कारभार; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

दौलत झावरे

अहमदनगर: जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांसाठी विना परवानगी सुसज्ज दालने उभारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतली आहेत. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे माध्यमिक शिक्षण विभागाच्या गळणाऱ्या इमारतीची दुरुस्ती होत नसल्याने कर्मचारी हैराण झाले आहेत. महत्त्वाच्या फायलींपेक्षा अधिकाऱ्यांच्या सोयी करण्यात प्रशासन व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा परिषदेच्या आवारात नगर पंचायत समितीची जुनी इमारत आहे. या इमारतीत सध्या माध्यमिक शिक्षण विभागसह वेतनपथक कार्यालय, नगर तालुका महिला बालकल्याण कार्यालय आदी कार्यालये येथे आहेत. या इमारतीच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या इमारतीला गळती लागली आहे. त्याची डागडुजी करण्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे. दरवर्षी पावसाळ्या या इमारतील वीजपुरवठा खंडीत ठेवण्यात येतो. पावसळ्यात या कार्लयातील फाईल व संगणक भिजू नये म्हणून प्लॅस्टिक कागदप अंथरून ठेवला जात आहे.

इमारतीला पावसळ्यात लागणाऱ्या गळीबाबत माध्यमिक शिक्षण विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे २०२० मध्ये पत्रव्यवहार केला आहे. त्यानंतर २०२१ मध्येही पत्रव्यवहार केलेला आहे. या पाठपुरव्यानंतर मात्र बांधकाम विभागाने इमारत दुरुस्तीची पाहणी करून त्यासाठी लागणारा खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आलेले आहे. मात्र प्रत्यक्षात कामकाजासाठी निधीची तरतूद केलेली नाही. मात्र जिल्हा परिषदेत नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून दालने सुसज्य केलेली आहेत. काही दालनांचे कामकाजही विनापरवानगी करण्यात आलेले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे अंदाजपत्रक तयार करून ते मंजूर करून घेतले जात आहे.

दुसरीकडे जिल्ह्यातील सुमारे एक हजार शाळा व दहा हजार शिक्षकांचे दप्तर असुरक्षित असतानाही त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सध्या कार्यालयाचा कारभार छतावर प्लॅस्टिक कागद टाकून सुरू आहे.

या दालनांचे झाले नूतनीकरण

  • ग्रामीण पाणीपुरवठा

  • उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी

  • प्राथमिक शिक्षण विभागात स्वतंत्र दोन केबिन

  • रोजगार हमी योजना अधिकारी दालन

  • तीन पदाधिकाऱ्यांची दालने

जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या जुन्या पंचायत समितीच्या इमारतीची डागडुजी होण्यासाठी आगामी वर्षात नियोजन करण्यात येईल.

-प्रवीण जोशी, प्रभारी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम, दक्षिण.

जुन्या पंचायत समितीच्या इमारतीची डागडुजीसाठी संबंधित विभागाने पत्रव्यवहार केलेला आहे. त्यानंतर या इमारतीची पाहणी करून दुरुस्तीसाठी दोन वर्षांपूर्वी सुमारे १२ लाखांचे खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आलेले आहे.

-शिवाजी राऊत, सहायक अभियंता, नगर तालुका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Khan Death Claim : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू ? पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

मला आजही महागड्याच.... मोहसीनने दुसऱ्या पत्नीसोबत फोटो शेअर करताच उर्मिला मातोंडकरने मारला टोमणा; पोस्ट करत म्हणाली

Tata Sons N Chandrasekaran : टाटा समूहाला मोठा धक्का? चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याच्या बातमीने शेअर्स गडगडले, TCS मध्ये मोठी घसरण

Sri Lanka squad for 1st Test vs India: विजय आपलाच... भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून श्रीलंकेच्या दोन स्टार खेळाडूंची माघार; १५ सदस्यीय संघ जाहीर

हातात पिशव्या, पायात चप्पलही नाही... लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी चक्क कंडक्टरसोबत पळाली; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT