Nilesh lanke Esakal
अहिल्यानगर

Nilesh lanke: नगरमध्ये रात्रीस खेळ चाले! मतदानाच्या आधी पैशांचा पाऊस? BJPनं पैसे वाटल्याचा लंकेंचा दावा; video viral

Nilesh lanke: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अनेकदा पैसै वाटल्याचा दावा केला जातो. या दरम्यान बारामतीप्रमाणेच काल मध्यरात्रीच्या सुमारास अहमदनगरमध्ये भाजपने पैसे वाटल्याचा दावा करण्यात आला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अनेकदा पैसै वाटल्याचा दावा केला जातो. या दरम्यान बारामतीप्रमाणेच काल मध्यरात्रीच्या सुमारास अहमदनगरमध्ये भाजपने पैसे वाटल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंबधीचे व्हिडीओ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नगरचे उमेदवार सोशल मिडीया एक्सवर शेअर केला आहे.

भाजपचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पैसे वाटतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर समोर आला आहे. या व्हिडीओ प्रकरणाची तपासणी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. अहदनगरचे शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंकेंनी पैसे वाटतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

निलेश लंके यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर पैसे वाटतानाचे काही व्हिडीओ शेअर केले आहे. व्हिडीओमध्ये भाजप पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदेंचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओसोबत निलेश लंके म्हणाले, बारामतीसारखी पैसे वाटपाची पुनरावृत्ती अहमदनगर लोकसभा क्षेत्रात सुद्धा भाजपने कायम ठेवली. परंतु या धनशक्तीला जनशक्ती पुरून उरणार. भाजपा पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे याला पैसे वाटतानाच्या या व्हिडीओची शहानिशा करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

काय म्हणाले निलेश लंके?

अहमदनगर लोकसभेतील जनता स्वाभिमानी आहे, ती भाजपच्या पैशांच्या मोहाला आणि दमदाटीला बळी पडणार नाही. भाजपला पराभव समोर दिसत आहे, त्यामुळे या गोष्टी घडताना दिसत आहे.

हीच का तुमची दोन दिवसाची यंत्रणा?

पारनेर भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांना सुजय विखे पाटील यांचे वडझिरे येथे पैसे वाटताना रंगेहात पकडले.. आता तुम्ही ठरवा तुम्हाला चार-पाचशे रुपये देऊन तुमचा लोकशाहीचा अधिकार विकत घेणारा खासदार हवा का विकास करणारा, सामान्यांसाठी लढणारा हवा? असंही लंकेंनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palava Flyover: सात वर्षे बांधकाम, ७२ कोटी खर्च... पण ७ महिनेही महत्वाचा उड्डाणपूल टिकला नाही, गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

Pali Crime : पालीत बनावट पोलिसांची दहशत; वृद्ध महिलेला फसवून पन्नास हजारांचे दागिने लंपास, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Updates : खरीप हंगाम पूर्ण वाया गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात

Duleep Trophy Final: विदर्भाच्या यशचं द्विशतक फक्त ६ धावांनी हुकलं, पण रजत पाटिकरच्या संघाने सामन्यावर मिळवली मजबूत पकड

"एका व्हॅनमध्ये साहेब विवस्त्र बसलेले असतात आणि..." बॉलिवूड दिग्दर्शकाने केली कलाकारांची पोलखोल, म्हणाला

SCROLL FOR NEXT