ahmednagar  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : लम्पीने पशुधनाची माती, मातीच्या बैलांना मोल

लम्पी साथ रोगाच्या प्रतिबंध, निर्मूलनासाठी संपूर्ण अहमदनगर जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. जनावरांची आवक-जावक, आठवडे बाजारा, शर्यती, प्रदर्शनांवर निर्बंध घातले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर - लम्पीची साथ यंदाही शिरजोर झाली आहे. दिवसेंदिवस जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी बळीराजाच्या जीवाला घोर लागला आहे. सलग दुसऱ्या वर्षी पोळा सणावर लम्पीचे सावट आहे. निर्बंधामुळे शेतकऱ्यांना हा सण साजरा करता येणार नाही. या साथीने पशुधनाची माती करून टाकली आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर मातीच्या बैलाला मोल आले आहे.

लम्पी साथ रोगाच्या प्रतिबंध, निर्मूलनासाठी संपूर्ण अहमदनगर जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. जनावरांची आवक-जावक, आठवडे बाजारा, शर्यती, प्रदर्शनांवर निर्बंध घातले आहेत. एका राज्यातून दुस-या राज्यात,

एका जिल्ह्यातून दुस-या बाधित जिल्ह्यात जनावरांची वाहतूक केल्यामुळे बाधित जनावरापासून निरोगी जनावरांना या रोगाचा प्रादूर्भाव होतो. ही साथ विषाणूजन्य सांसर्गिक असल्याने या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून अहमदनगर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाय योजना केली आहे.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अहमदनगर जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पोळ्याचा सण साजरा करता येणार नाही.

गोजातीय प्रजातीची सर्व गुरे, म्हशी यांची ज्या ठिकाणी ते पाळले (ठेवले) जातात, त्या ठिकाणापासून नियंत्रितक्षेत्रातील किंवा त्या क्षेत्र बाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई आहे. २१ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी हे निर्बंध घातले आहेत.

किती जनावरांना बाधा

लम्पीमुळे जिल्ह्यात ३ हजार ७१९ जनावरांना लागण झाली. त्यातील २ हजार ७५१ जनावरे बरीही झाली. मात्र, २२५ जनावरे दगावली. सध्या ७४३ जनावरे आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ३८ जनावरांची स्थिती गंभीर आहे. लम्पीने जिल्ह्यातील ५३७ गावांना वेढा घातला आहे. ९६५ गावांना अलर्ट देण्यात आला आहे. १४ लाख ४ हजार ५८९ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणानंतरही प्रादूर्भाव कमी होण्यास तयार नाही. जिल्ह्यात मरतुकीचे प्रमाण ६ टक्क्यांवर गेले आहे.

शेवगावात साथीचा बहर

शेवगाव, श्रीगोंदा, राहुरी, नेवासा, पाथर्डी या तालुक्यात लम्पीचा लपंडाव सुरू आहे. दररोज बाधित जनावरांची संख्या वाढत आहे. त्यावर उपाययोजना केल्या जात आहेत. वासरे बाधित होत आहेत. लम्पीमुळे जनावरांच्या किंमती पडल्याचे दिसते. मात्र, शेतकऱ्यांची स्वस्त मिळते म्हणून खरेदी करणे टाळावे, अन्यथा गोठ्यातील इतर निरोगी जनावरांचा लागण होण्याची भीती आहे, असे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT