Ujma Shaikh Esakal
अहिल्यानगर

मदरशातील स्वयंपाकी साहिराची मुलगी ‘पीएसआय’,पितृछत्र नसताना मातेच्या संघर्षाला उजमाचे बळ; बाथरूमच बनली अभ्यासिका

आष्टी (जि. बीड) येथील मदरशात मुलांचा स्वयंपाक बनविण्यासाठी मिळणाऱ्या रोजंदारीतून आईने आपल्या मुलीला शिकवून मोठ्या कष्टातून पीएसआय बनविले आहे.

Manoj Bhalerao

आष्टी (जि. बीड) येथील मदरशात मुलांचा स्वयंपाक बनविण्यासाठी मिळणाऱ्या रोजंदारीतून आईने आपल्या मुलीला शिकवून मोठ्या कष्टातून पीएसआय बनविले आहे. वडील हयात नसताना आईने संघर्ष केला आणि मुलीने त्या संघर्षाला दाद देत आकाशाला गवसणी घालण्याची किमया केली आहे.

आष्टी शहरातील करीमभाई भंगारवाले यांची नात उजमा सलीम शेख पोलिस सब इन्स्पेक्टर बनली आहे. तिचे वडील ती सहा वर्षांची असताना देवाघरी गेले. ‘उजमा’ने आईचा २७ वर्षांचा संघर्ष संपविला, याचा मोठा आनंद आई साहिरा सलीम शेख व तिच्या आजोबांना झाला आहे. अर्थात उजमालाही यासाठी मोठे कष्ट करावे लागले. एका ध्येयाने प्रेरित होऊन तिने हे यश मिळविले आहे.

आईने आष्टी येथील मदरसा व जिल्हा परिषद कन्या शाळेत भात शिजविला. मुलीला पीएसआय बनवले. उजमाचे शालेय शिक्षण आष्टी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. दहावी, बारावी व बीसीए हंबर्डे महाविद्यालयात झाले. यानंतर स्पर्धा परीक्षेकडे लक्ष केंद्रित केले. घरात उजमानेही परिस्थितीवर मात करीत घरातील बाथरूम लायब्ररी, अभ्यासिका बनविली. ती रोज येथेच अभ्यास करीत. तिच्या संघर्षमय प्रवासाला यश देखील मिळाले.

१९९२ मध्ये कडा येथील शेतकरी सर्वसामान्य कुटुंबातील मंदा साहेबराव घोगरे पान ४ वर

ऊर्फ शुभदा प्रदीप चव्हाण यांनी सर्व परिस्थितीवर मात करून मराठवाड्यात पहिली महिला पीएसआय म्हणून यश मिळविले होते. त्यांची आठवण आज उजमाच्या यशाने आष्टीकरांना झाल्याशिवाय रहात नाही. याचे कारण उजमा ही देखील तालुक्यातील मुस्लिम समाजातील पहिली मुलगी ठरली आहे. एका मुस्लिम कुटुंबातील मुलीने मिळविलेले यश हे इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे. मुंबई येथील पीआय शुभदा चव्हाण व त्यांचे पती ॲड. प्रदीप चव्हाण व सहकाऱ्यांनी उजमाची आदर्श आई साहिरा शेख यांचा आष्टी येथे नुकताच सत्कार केला.

उजमाला लहानपणापासून शिक्षणाची आवड होती. ती शाळेत चांगल्या मार्काने पास होत होती. यामुळे मी आणि घरातील सर्वांनी तिला पाठिंबा दिला. यामुळे मीही मागे हटले नाही. तिनेही आमच्या कष्ट, परिश्रमाचे सार्थक केले. यामुळे आम्ही खूप आंनदी झालो आहोत.

-साहिरा शेख, आई.

मला लहानपणापासून पोलिस खात्याची आवड होती. त्यात आमच्या घरी सय्यद नावाचे पीआय घरी येत. ते मला अभ्यास करताना पहात. ते मला नेहमी म्हणत तू स्पर्धा परीक्षेत उतर, तुला नक्कीच यश मिळेल. मीही माझा निर्णय पक्का केला. त्यांची प्रेरणा घेऊन मी हे यश मिळविले. यासाठी मला आईसह घरातील सर्वांचा पाठिंबा मिळाला. मला पोलिस खात्यात आणखी पुढे जायचे आहे.

-उजमा सलीम शेख.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagan Mohan Reddy: मोठी बातमी! जगनमोहन रेड्डींच्या पक्षाने 'NDA'च्या सीपी राधाकृष्णन यांना जाहीर केला पाठिंबा

Uttar Pradesh : योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये केले देशातील दुसऱ्या हरित हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन

ब्रेकिंग! 18 दिवसांत अतिवृष्टीने राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील 3.73 लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट; कृषी विभागाचा नजर अंदाज अहवाल; पंचनामे करण्यास ई-पीक पाहणीची अडचण

MP Nilesh Lanke : श्रीरामपूर-परळी ब्रॉडगेज प्रकल्प पुन्हा सुरू करा; नीलेश लंके यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

6,6,6,6,6,6! भारतीय गोलंदाजाची T20 मध्ये १९ चेंडूंत फिफ्टी, आठव्या क्रमांकावर आला धुमाकूळ घातला, नंतर ३ विकेट्सही टिपल्या

SCROLL FOR NEXT