‘मिशन कवचकुंडल’  sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : मोलमजुरांना मिळाले रात्री ‘कवचकुंडल’

कवच-कुंडल लसीकरण मोहिमेंतर्गत नुकतेच रात्रीचे लसीकरण सत्र विशेष बाब म्हणून राबविण्यात आले होते.

दौलत झावरे

अहमदनगर : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजनांबरोबरच लसीकरण करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. त्यासाठी नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. श्रीरामपूरमध्ये प्रांताधिकारी अनिल पवार व ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने राबविलेल्या रात्रीच्या लसीकरण मोहिमेची जिल्हाभर चर्चा सुरू झाली आहे. तशाच प्रकारची मोहीम जिल्ह्याच्या अन्य भागांत राबविण्याची इच्छा व्यक्त केली जात आहे.

श्रीरामपूर येथील आझाद मैदान येथे कवच-कुंडल लसीकरण मोहिमेंतर्गत नुकतेच रात्रीचे लसीकरण सत्र विशेष बाब म्हणून राबविण्यात आले होते. या मोहिमेचा सर्वच घटकांना लाभ घेता यावा, यासाठी ही रात्रीची लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती.

सकाळी बाहेर पडणाऱ्यांसह मोलमजुरी करणाऱ्यांना लसीकरण करून घेता यावे, यासाठी हा उपक्रम प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या संकल्पनेतून पुढे आला. त्यावर तहसीलदार प्रशांत पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश बंड, वैद्यकीय अधिकारी तौफिक शेख, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, प्रसन्न धुमाळ आदींनी कामकाज करून हे शिबिर भरविले. शिबिरात जास्तीत जास्त जणांनी सहभागी व्हावे, यासाठी समाजमाध्यमावर त्यासंदर्भात पोस्ट व्हायरल करण्यात आल्या. त्यामुळे या शिबिरात सुमारे १०० जणांचे लसीकरण एकाच वेळी झाले.

या मोहिमेच्या पोस्ट मात्र जिल्ह्यातील समाजमाध्यमावरील इतर ग्रुपमध्ये व्हायरल झाल्याने, या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात आले.

सर्वांचे प्रबोधन, मग लसीकरण

मोलमजुरी करणारे व स्थलांतरित यांचा शोध घेऊन आरोग्य विभागाने प्रथम त्यांचे प्रबोधन केले. त्यानंतर त्यांचे लसीकरण करण्यात आले. पहिल्याच प्रयोगाला यश आले आहे. या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. त्याची अंमलबजावणी पुन्हा कधी होणार, अशी चर्चा सुरू आहे.

आठवडे बाजारापूर्वी राबवा मोहीम

मोलमजुरी करणाऱ्यांना काम बुडवून लसीकरणाला जाता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यातील गावागावांतील आठवडे बाजारांच्या पूर्वसंध्येला लसीकरण मोहीम राबविल्यास मोलमजुरी करणाऱ्या सर्वांना लसीकरण करून घेणे शक्य होणार आहे. प्रशासनाने याबाबत विचार करावा, अशी मागणी होत आहे.

सर्वांचे लसीकरण व्हावे, असे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली. श्रीरामपूरमध्ये एक दिवस रात्री लसीकरण मोहीम राबविणे, हा त्याचाच एक भाग होता. आगामी काळातही अशाच प्रकारची मोहीम राबविण्यासाठी प्रयत्न करून सर्वांचे लसीकरण करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

- अनिल पवार, प्रांताधिकारी, श्रीरामपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Kolhapur : शक्तिपीठ महामार्गासाठी कोल्हापुरात जमीन मोजणीचा आदेश आला, राजू शेट्टी, बंटी पाटलांची भूमिका काय?

LPG New Connection Update : नवीन एलपीजी कनेक्शनसाठी बुकिंग कधीपासून सुरू होणार? सरकारने स्पष्ट केली स्थिती

Central Railway: कोकणकरांसाठी आनंदवार्ता! मुंबई-मडगावदरम्यान गणपती विशेष गाड्या; कुठून, कधी धावणार ट्रेन?

‘फुलों का तारों का’ गाण्याची भन्नाट गोष्ट! लता मंगेशकरांनी काढला चक्क 10 वर्षांच्या मुलाचा आवाज

Marathi News Live Updates : नेपाळमधील महापुराची परिस्थिती अत्यंत गंभीर; ओवेसींकडून मदतीचे आवाहन

SCROLL FOR NEXT