धनश्री प्रवीण भिसे sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : मुलीला वाचविण्यासाठी आईची धडपड

थोरल्या मुलीच्या पोटात कॅन्सरने घर केले. ट्यूमर असल्याचे निष्पन्न झाले

राजेश नागरे

अहमदनगर : ‘अडचणी येऊ लागल्या, की चहूबाजूने येतात,’ याचे उदाहरण म्हणजे भिसे कुटुंब. दहा महिन्यांपूर्वी कर्त्या पुरुषाचे निधन झाले. तीन चिमुरडी उघड्यावर पडली. दुःखात भर म्हणून थोरल्या मुलीच्या पोटात कॅन्सरने घर केले. ट्यूमर असल्याचे निष्पन्न झाले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत तिला वाचविण्यासाठी आईची धडपड सुरू झाली आहे. मोठा खर्च जीवघेणा ठरत आहे.

खोसपुरी (ता. नगर) येथील धनश्री प्रवीण भिसे (वय १०) असे त्या मुलीचे नाव आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पोटातील ट्यूमरच्या जीवघेण्या आजाराशी ती सामना करीत आहे. प्रवीण यांचे मागील दहा महिन्यांपूर्वी अपघाती निधन झाले. घरी दीड-दोन एकर शेती. दोन मुली, एक मुलगा, अशा तीन चिमुरड्यांना घेऊन आई मनीषा दुःखाचा डोंगर झेलत संसाराचा गाडा हाकत आहे. थोरली धनश्री लवकर हाताखाली येईल.

चांगली शिकून कुटुंबाला आधार देईल, ही तिची अपेक्षा, पण नियतीला तेही मंजूर नाही. धनश्री खोसपुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता चौथीत शिकते. गेल्या काही महिन्यांपासून तिला थंडी- ताप, पोटदुखी असा त्रास जाणवत होता. स्थानिक डॉक्टरांकडून तात्पुरते उपचार केले जात होते. हा आजार जास्तच वाढू लागला. एचबी ४.५ वर येऊन धडकला. त्यामुळे नगरच्या मॅक केअर हॉस्पिटलमध्ये तिची तपासणी करण्यात आली.

स्कॅनिंगमध्ये तिच्या पोटात कॅन्सरचा सुमारे अर्धा किलोचा ट्यूमर असल्याचे निदान झाले. कॅन्सरतज्ज्ञ डॉ. सतीश सोनवणे तिच्यावर उपचार करीत आहेत. कॅन्सरचा आजार ऐकून आईने धीर सोडला. मुलीचे चुलते संदीप भिसे, तसेच नातेवाइकांनी धीर देत मुलीवर उपचाराचे नियोजन केले. केमो थेरपीसाठी मोठा खर्च येत आहे.

दोन महिन्यांत शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. त्यासाठी शासकीय योजनांचे दरवाजे ठोठावले जात आहेत. मात्र, त्यास अद्याप यश येत नाही. शस्त्रक्रिया लवकर झाल्यास पुढील धोका टळेल. उपचाराचा खर्चही पेलवत नसल्याने, आईसमोर अडचणींचा डोंगर उभा आहे.

मिळावेत मदतीचे हात

दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणे।

देशे काले च पात्रे च तद्दानं सात्त्विकं स्मृतम्।।

श्रीमद्‌भगवद्‌गीतेच्या या श्लोकाप्रमाणे दान

करणे कर्तव्य आहे. पात्र व्यक्तीस ते दिले जावे. असे दान सात्त्विक मानले जाते. भाग्यश्री भिसे हिच्यावर कॅन्सरच्या उपचारासाठी मोठा खर्च होत आहे. औषध दुकानाची मोठी उधारी झाली. हॉस्पिटलचे बिल थकले. अशा परिस्थितीत पुढील उपचार घेणे असह्य होत आहे.

त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी तिला मदत केल्यास पुढील धोका टळणार आहे. मदतीसाठी मॅक केअर हॉस्पिटल (अहमदनगर) किंवा संदीप भिसे (मोबा. ९३५९३८३५९९) यांच्याशी संपर्क करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Interim PM Sushila Karki : नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की यांचे भारतातील ‘या’ प्रसिद्ध तीर्थक्षेत्राशी आहे खास नाते!

Latest Marathi News Updates : खरीप हंगाम पूर्ण वाया गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात

Nitin Gadkari : ४०००० कोटींचे उत्पन्न... ७० लाख नोकऱ्या, गडकरींनी दिलेला कमाईचा मंत्र काय आहे?

Viral: वजन कमी करा आणि पैसे मिळवा... प्रसिद्ध कंपनीची अनोखी ऑफर, १८ किलो वजन कमी करणाऱ्याला २,४६,८४५ रुपये दिले

Marriage Registration Issue : सहा महिन्यांपासून विवाह नोंदणी पोर्टल ठप्प; हजारो विवाहांची नोंदणी रखडली

SCROLL FOR NEXT