Ahmednagar  sakal media
अहिल्यानगर

महावितरणच्या कारभारामुळे येथे बाराही महिने वाजतात ‘फटाके’

सुवर्णव्यावसायिक व नागरिकांना जीव धरावा लागतोय मुठीत

अमित आवारी

अहमदनगर : दीपावली सुरू झाल्याने घरोघरी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. मात्र, शहरातील एक भाग असाही आहे, जेथे बाराही महिने ‘फटाके’ वाजतात. मात्र, ते शोभेच्या दारूकामाचे नव्हे, तर उच्चदाबवाहिनी वीज तारांच्या घर्षणाचे. पावसाळ्यात तर या तारांतून ठिणग्या पडतात. या ‘फटाक्यां’ची आतषबाजी त्या भागातील व्यावसायिक व ग्राहक जीव मुठीत घेऊन भेदरलेल्या नजरेने पाहतात.

हे ठिकाण आहे शहरातील सर्वात जुन्या बाजारपेठेतील. गंज बाजार व सोनार गल्लीतील. या भागात महावितरणच्या विद्युततारा उंच इमारतींना बिलगून आहेत. त्यातच काही तारा तर हात पोचेल अशा अंतरावर झोका घेत आहेत. हा विद्युत तारांचा झोका एखाद्याचा जीवही घेऊ शकतो, याचे महावितरण प्रशासनाला सोयरसुतक नाही.

यासंदर्भात सुवर्ण व्यावसायिकांनी आठ-दहा वेळा महावितरण प्रशासनाकडे निवेदने दिली. महावितरणचे कर्मचारी येतात, पाहणी करतात आणि निघून जातात. विद्युत खांबांची अवस्था कोळ्याच्या जाळ्यासारखी झाली आहे. वाऱ्याच्या तीव्र झुळुक आली, की या तारा एकमेकींना घासतात. त्यातून ठिणग्या उडतात. पावसाळ्यात या भागात पाणी साचते. त्यात विजेच्या ठिणग्या पडतात. हे विद्युत फटाके जीवघेणे ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस सुरू असताना सुवर्ण व्यावसायिक ग्राहकांना दुकानातच थांबण्याचा सल्ला दिला जातो. महावितरण एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहत आहेत का, अशी तीव्र प्रतिक्रिया सुवर्ण व्यावसायिक विचारत आहेत.

"सोनार गल्लीतील विद्युत तारांसंदर्भात महावितरण प्रशासनाला आठ-दङा वेळा निवेदने दिली आहेत. मात्र, त्यांच्या अधिकाऱ्यांना इकडे पाहायला वेळ नाही. महावितरणची कामे खासगी ठेकेदारांना देऊन ते मोकळे होत आहेत. अधिकारी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहेत काय? वीजबिल भरले नाही तर सक्तीने वसुली करण्यासाठी येणारे महावितरण कर्मचारी समस्या सोडविण्यासाठी का येत नाहीत?"

- संतोष वर्मा, जिल्हाध्यक्ष, सराफ सुवर्णकार संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT