अहिल्यानगर

Ahmednagar: कुणी ठेकेदार देता का ठेकेदार?महानगरपालिकेला तिसऱ्यांदा निविदा काढण्याची नामुष्की

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे पॅचिंग करण्यासाठी ठेकेदार तयार नाहीत. शहर आणि उपनगरांसाठी प्रत्येकी ५० लाखांच्या दोन निविदा तीनदा प्रसिद्ध करूनही एकही ठेकेदार काम करण्यास तयार नाही.

सकाळ डिजिटल टीम

Ahmednagar Municipal Corporation Tender for Road Patching: शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे पॅचिंग करण्यासाठी ठेकेदार तयार नाहीत. शहर आणि उपनगरांसाठी प्रत्येकी ५० लाखांच्या दोन निविदा तीनदा प्रसिद्ध करूनही एकही ठेकेदार काम करण्यास तयार नाही. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कुणी ठेकेदार देता का ठेकेदार ? असे म्हणण्याची वेळ महानगरपालिका प्रशासनावर आली आहे.

मध्यवर्ती शहरासह उपनगरांमधील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. जागोजागी रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी खडी उघडी पडली आहे, तर काही ठिकाणी एक ते दीड फुट खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना रस्त्यांवरून चालणे कठीण झाले आहे. महापालिका प्रशासनाने या रस्त्यांच्या पॅचिंगच्या कामासाठी प्रत्येकी ५० लाख रूपये खर्चाच्या दोन निविदा मागविल्या.

परंतु या निविदांना ठेकेरांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे फेरनिविदा काढण्याची वेळ प्रशासनावर आली. त्याकडेही ठेकेदारांनी पाठ फिरवली. त्यामुळे आता तिसऱ्यांदा निविदा काढण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. एकीकडे खड्ड्यांमुळे रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे, तर दुसरीकडे पॅचिंगसाठी ठेकेदार मिळत नसल्याने महापालिका प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.

खड्डे बजविले जात नसल्याने नागरिकही संताप व्यक्त करत आहेत. येत्या १९ फेब्रुवारीला शहरात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात येते. मिरवणुकीपूर्वी पॅचिंगचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. परंतु ठेकेदार मिळत नसल्याने या कामास उशीर होणार आहे.

थकीत बिले मिळेनात

शहरात विविध प्रकारची विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांना त्यांच्या कामाची बिले वेळेत मिळत नाहीत. या ठेकेदारांची कोट्यवधी रूपयांची बिले महापालिकेकडे थकीत आहेत. जुन्या कामाची बिले मिळत नसल्याने ठेकेदार नवीन कामे घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे शहरातील अनेक विकासकामे रखडली आहेत. ठेकेदारांची देणी देण्याचा प्रश्‍न महापालिका प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

मोठी कामेही रखडली

मध्यवर्ती शहरात १४४ कोटी रूपये खर्चाच्या भुमिगत गटार योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु मागील काही दिवसांपासून या योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. इतर काही मोठी विकासकामे देखील रखडली आहेत. केडगाव उपनगरातील शाहूनगर रस्त्याचे काम वर्षभरापासून रखडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT