अहिल्यानगर

लॉकडाउन शिथिल होताच नगरकरांमागे लागली कराची कटकट

अमित आवारी

अहमदनगर ः कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊन लॉकडाउन संपताच महापालिकेच्या वसुली विभागाला आता मालमत्ताकराच्या वसुलीचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने महापालिकेच्या वसुली विभागाने तयारी सुरू केली आहे. सध्या मालमत्ताकराची बिले तयार करण्याची प्रक्रिया वेगात सुरू असून, लवकरच नागरिकांना बिलांचे वाटप केले जाणार आहे.

मालमत्ता करदात्यांना प्रोत्साहन म्हणून महापालिकेनेही जून महिन्यात करात दहा टक्के सूट जाहीर केली आहे. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यामुळे महापालिका प्रशासनाने सर्व लक्ष कोरोना निर्मूलनावर केंद्रित केले होते. त्यासाठी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी चार दक्षता पथके तयार केली होती. (Ahmednagar Municipal Corporation started tax collection)

या पथकांच्या माध्यमातून शहरातील सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत होती. शिवाय, इतरही कामांसाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. यात सर्वच विभागांचे कर्मचारी व अधिकारी तैनात करण्यात आले होते. प्रामुख्याने वसुली विभागाचा समावेश होता. वसुली विभागाचे काम यामुळे अतिशय संथ गतीने सुरू होते. राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाकडून शहरातील लॉकडाउन उठवताच महापालिकेतील सर्व कर्मचारी आज कार्यालयात हजर होते.

महापालिकेच्या वसुली विभागाला त्यांचे कर्मचारी पुन्हा मिळताच आजपासून मालमत्ताकराची बिले तयार करण्याचे काम वेगाने सुरू होते. लवकरच नागरिकांना बिले घरपोच दिली जाणार आहेत. शहरात एक लाख १७ हजार मालमत्ता करदाते आहेत. त्यांची बिले तयार करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे.

महापालिकेने एप्रिल व मे महिन्यांत मालमत्ताकर भरणाऱ्यांना करामध्ये दहा टक्के सूट दिली होती. मात्र, या दोन महिन्यांत शहरात लॉकडाउन असल्याने अनेकांना या सवलतीचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे महापालिकेने जूनअखेरपर्यंत मालमत्ताकरावर दहा टक्के सूट दिली आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात मालमत्ताकरावर आठ टक्के सूट दिली जाणार आहे. त्यानंतर मात्र कोणतीही सूट न देता महापालिका वसुलीची जोरदार मोहीम हाती घेणार आहे.

मालमत्ताकर ऑनलाइनही भरता येणार
महापालिकेतील वसुली विभागात होणाऱ्या गर्दीपासून दूर राहून मालमत्ताकरावरील दहा टक्के सवलतीचा फायदा घेणेही आता सहज शक्य आहे. यासाठी महापालिकेने नागरिकांना मालमत्ताकर भरण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार, महापालिकेचे संकेतस्थळ किंवा ॲपद्वारे मालमत्ताकर ऑनलाइन भरता येणार आहे.(Ahmednagar Municipal Corporation started tax collection)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT