ahmednagar municipal corporation
ahmednagar municipal corporation sakal
अहमदनगर

Ahmednager : ३२ कोटींच्या जागेचा वाद चिघळला

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : सावेडी स्मशानभूमीच्या ३२ कोटी रुपयांच्या जागेचे वादंग थांबता थांबेना. ही जागा खरेदी केल्यास महापालिकेचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा माजी नगरसेवक विक्रम राठोड यांनी दिला. दरम्यान, महापौर रोहिणी शेंडगे या बुधवारी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

सावेडी उपनगरासाठी स्वतंत्र स्मशानभूमीची अनेक वर्षांची मागणी आहे. त्यासाठी जागा देखील आरक्षित करण्यात आली. परंतु संबंधित मालक जागा ताब्यात देत नसल्याचे कारण पुढे करत महापालिकेच्या नगररचना विभागाने नवीन दोन हेक्टर जागा खरेदीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला.

ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांच्यासह काही नगरसेवकांचा विरोध असतानाही महापौर रोहिणी शेंडगे यांनी नवीन जागा खरेदी करण्याचा ठराव मंजूर केला. नवीन जागा खरेदी करण्यासाठी तब्बल ३२ कोटी रुपये लागणार आहेत. त्यामुळे अनेक नगरसेवकांनी या जागा खरेदीस विरोध केला आहे.

महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना कवडीमोल भावाची जमीन ३२ कोटी रुपयांना खरेदी करण्याचा घाट घालण्यात आला आहे. या जागा खरेदीचा व्यवहार झाल्यास महापालिकेचे कामकाज बंद पाडण्याचा इशारा माजी नगरसेवक विक्रम राठोड यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिला आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने अधिकाऱ्यांशी संगनमत करून भूखंडाचे श्रीखंड लाटण्याचा डाव मांडला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

ठराव विखंडित करा

महासभेचा कोरम पूर्ण नसतानाही स्मशानभूमीसाठी ३२ कोटी रुपयांची नवीन जागा खरेदी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. अवघ्या १५ नगरसेवकांच्या उपस्थितीत हा ठराव मंजूर झाला आहे. हा ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठवावा, अशी मागणी नगरसेविका शील चव्हाण यांनी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे केली आहे.

पाठिंबा देणाऱ्यांच्या प्रभागात बोंबाबोंब

नवीन जागेच्या ठरावावर पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा महासभा बोलवा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यावेळी सर्व नगरसेवकांनी उपस्थित राहून भूमिका स्पष्ट करावी, असे जाहीर आवाहन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. जागेच्या ठरावाला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांच्या प्रभागात बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचा इशारादेखील त्यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र, यूपी, हरियाणा आणि बिहार.. नंदुरबारच्या सभेची तुफान गर्दी पाहून राहुल गांधींनी केली भविष्यवाणी

Latest Marathi News Live Update: चाकण परिसरात जोदार पावसाला सुरुवात; अजित पवारांच्या सभेत पावसाचा व्यत्यय

Salman Khan: गॅलेक्सी अपार्टमेंट गोळीबार प्रकरणावर पहिल्यांदाच बोलली सलमानची एक्स गर्लफ्रेंड; म्हणाली,"माझी आई आणि मी..."

Arvind Kejriwal : ''पुढचे पंतप्रधान मोदी नव्हे तर अमित शाह'' केजरीवालांचं मोठं विधान; कारणही सांगितलं

RBI: धक्कादायक! टाटासह 15 कंपन्यांनी NBFC नोंदणी प्रमाणपत्रे केली परत, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT