गावरान गायीच्या गोवऱ्यांना नगरकरांची पसंती sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : गावरान गायीच्या गोवऱ्यांना नगरकरांची पसंती

होळीसाठी आवश्यक असणाऱ्या गोवऱ्यांना नगर शहरात चांगली मागणी

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर: होळीसाठी आवश्यक असणाऱ्या गोवऱ्यांना नगर शहरात चांगली मागणी आहे. विशेषतः देशी गावरान गायीच्या शेणापासून बनविलेल्या गोवऱ्या खरेदी करण्यास नागरिक पसंती देत आहेत. शहर व परिसरातील गोशाळांनी याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘मार्केटिंग’ केले आहे. घरपोच गोवऱ्या देण्याची व्यवस्थाही काही गोशाळांनी केली आहे.

होळीचा सण हा भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा उत्सव. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी हा सण देशभरात साजरा केला जातो. उद्या (ता. १६) हा उत्सव साजरा होत आहे. या सणाला होळी, होळी पौर्णिमा, होलिकोत्सव अशी विविध नावे आहेत. उत्तर प्रदेशात हा सण अतिउत्साहाने साजरा होतो. महाराष्ट्रातही होळी सणाची सर्वांना ओढ असते. या दिवशी प्रत्येक घरासमोर गोवऱ्या, लाकडांची होळी पेटविली जाते. होळीची पूजा करून नेवैद्य दाखविला जातो. या सणासाठी गोवऱ्यांना चांगली मागणी असते. ग्रामीण भागात घरोघरी गोवऱ्या असतात, तथापि, शहरात त्या विकत घ्याव्या लागतात. आज शहरातील मुख्य बाजारपेठेत गोवऱ्यांचे ढीग दिसून आले. २५ ते ५० रुपयांना ५ गोवऱ्या, असे दर होते. ग्राहकांकडून, गायींच्या शेणापासून बनविलेल्या गोवऱ्या आहेत का, अशी विचारणा झाल्यानंतर, बहुतेक विक्रेत्यांनी तसे मार्केटिंग करीत विक्री केली.

गोशाळा सरसावल्या गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील गोशाळांनी गायीच्या शेणापासून गोवऱ्या बनविल्या. त्या होलसेल दराने विकल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Cylinder Shortage : जनता 'गॅस' वर स्वयंपाक चुलीवर...; ग्रामीण भागासह शहरातील हाॅटेल व्यावसायिकांना फटका...

मशीद शेख यांची महाराष्ट्र केसरीत दमदार कामगिरी; सुवर्णपदकासह बुलेट आणि रोख पारितोषिकावर नाव कोरले

मोखाड्यात "घर घर संविधान" उपक्रमांतर्गत भीमगीतांची जल्लोषात मैफिल; लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीवर नाराजी

LPG Crisis: ऊर्जा संकटात केंद्र सरकारचा मोठा निर्णय! LPG पुरवठ्यात 20% वाढ; वाटप 50% पर्यंत वाढवले, राज्यांना दिलासा

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरु

SCROLL FOR NEXT