अहिल्यानगर

दोनशे वर्षांची पाषाणाची विठ्ठल मूर्ती आढळली!सरदार त्रिंबक डेंगळे वाड्यातील ऐतिहासिक ठेवा

दुसरे बाजीराव पेशव्यांचे दिवाण असलेल्या सरदार त्रिंबक डेंगळे यांच्या निमगावजाळी (ता. संगमनेर) येथील ऐतिहासिक वाड्यात त्यावेळी ते देवपूजेसाठी वापरात असलेल्या दोनशे वर्षे जुनी पाषाणाची विठ्ठल मूर्ती आढळली आहे

Manoj Bhalerao

200 years Old Vitthal Statue: दुसरे बाजीराव पेशव्यांचे दिवाण असलेल्या सरदार त्रिंबक डेंगळे यांच्या निमगावजाळी (ता. संगमनेर) येथील ऐतिहासिक वाड्यात त्यावेळी ते देवपूजेसाठी वापरात असलेल्या दोनशे वर्षे जुनी पाषाणाची विठ्ठल मूर्ती आढळली आहे.‘यंदा कार्तिकीपूर्वी साक्षात विठ्ठल भेटला’ अशी प्रतिक्रिया इतिहासाचे अभ्यासक सुमित डेंगळे यांनी यावेळी दिली.

निमगावजाळी येथील सरदार त्रिंबक डेंगळे यांचा वाडा पाहण्यासाठी काही दिवसांपूर्वी काही माणसं आली होती. सुमित डेंगळे व डॉ. विजय वादक हे नेहमीप्रमाणे आलेल्या माणसांना वाडा व त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सांगत होते. यावेळी प्रवेशद्वार, तटबंदी, आडमागचा चौक आदी वाड्यातील जुन्या वास्तू दाखवण्यात आल्या.

यावेळी नेहमी बंद असलेल्या कोनाडा डॉ. वदक यांनी उघडला असता त्यामध्ये सागाचे सुंदर महिरपी देवघर व दोन्ही बाजूला दोन कप्पे काढले असल्याचे लक्षात आले. त्यामुळे कुतहलापोटी त्यांनी हात आतमध्ये घातला असता काळ्या पाषाणातील आखीव रेखीव, हातभर उंच व एक हात तुटलेली पांडुरंगाची मूर्ती बाहेर काढली, हे पाहून सारेच अवाक् झाले.(Latest Marathi News)

डेंगळे कुटुंबीयांची विठ्ठलभक्तीची परंपरा

सरदार त्रिंबकजी डेंगळे हे विठ्ठलभक्त असल्याने आळंदीला माउलींच्या दर्शनाला नित्यनेमाने जात असत. आळंदी देवस्थानला स्वतःच्या खासगीतून इनाम जमीनही त्यांनी करून दिली होती. तुकारामांचे अभंग त्यांना विशेष आवडीचे होते. पंढरपूर वाऱ्याही ते करीत. त्यांचे वंशजही विठ्ठलभक्त, वारकरी संप्रदायाचे.

त्रिंबकजी डेंगळे यांचे नातू दादासाहेब यांनी १८९१ साली गंगागिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह निमगावजाळीत घडवून आणला होता. त्यामुळे मूर्तीरुपी सापडलेला हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची मोठी जबाबदारी आता पार पाडावी लागणार आहे, असे इतिहासाचे अभ्यासक सुमित डेंगळे यांनी सांगितले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Zika Virus: पुण्याला ‘झिका’चा धोका कायम! विषाणूच्या जनुकीय संरचनेतही आढळले बदल; ‘एनआयव्‍ही’च्‍या शास्‍त्रज्ञांचा शोध

Sunetra Pawar: दुष्काळग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून धीर; पाणी, चारा, शिक्षणासाठीही मदत

IND vs WI 1st ODI Live: रोहित शर्मा बाद झाला, विराट कोहली मैदानावर आला... येताच २८ वर्षांपूर्वीचा मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडला...

४ वर्षात १११ खासदार-आमदारांचे पक्षांतर, सर्वाधिक इनकमिंग झालेला पक्ष भाजप नव्हे, भाजपात २९ जणांचा प्रवेश

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

SCROLL FOR NEXT