alka ambare 
अहिल्यानगर

Ahmednagar : विजेचा खांब अंगावर कोसळल्याने शेतात काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू; परिसरात हळहळ

सकाळ डिजिटल टीम

अकोले : अंगावर विजेचा खांब कोसळल्याने अकोले तालुक्यातील गणोरे ) येथील अलका नामदेव आंबरे (वय 55) यांचा जागीच दुदैवी मृत्यू झाला असल्याची घटना आज सोमवारी साडे चार वाजेच्या सुमारास घडली.

तालुक्यातील गणोरे परिसरातील शिंदेवाडी परिसरात आज लाईट शट डाऊन असल्यामुळे बाभळीचे झाड तोडण्याचे काम सुरू होते. मात्र यावेळी बाभळीच्या झाडाची फांदी शेजारी असलेल्या वीज वाहक तारांवर कोसळली. तारांवर झाडाची फांदी कोसळल्यामुळे तारांना आणि विजेच्या खांबांना मोठा हादरा बसला. त्यामुळे एका लाईनमधील तीन पोल हे एकाच वेळी कोसळले.

अलका आंबरे या याचवेळी आपल्या शेतात काम करीत होत्या. त्यांच्याजवळ देखील एक विजेचा खांब उभा होता. हा पोल थेट अलका आंबरे यांच्या अंगावर कोसळला. पोलचा अंगावर कोसळण्याचा वेग जास्त असल्याने त्यांना जबरदस्त मार लागला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्य झाला.

विजेचा खांब कोसळल्याचा मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली व तात्काळ त्यांना अकोले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मयत घोषित केले. अलका आंबरे यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या नातेवाईकांनी एकच टाहो फोडला. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त कऱण्यात येत आहे.

रात्री 10 वाजता गणोरे याठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अकोले पंचायत समितीचे माजी सदस्य संत नामदेव आंबरे यांच्या त्या पत्नी होत्या. या अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी अकोले ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is Rudali Tradition? : देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना 'रुदाली'ची उपमा; पण रुदाली म्हणजे कोण? काय आहे ही विचित्र परंपरा?

Thane News: शिवशाहीची धोकादायक अवस्था, व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाला जाग, अधिकाऱ्यांची सारवासारव

Adani Group Investment : दिवाळखोरीतून जाणाऱ्या ‘या’ कंपनीवर अदानी ग्रुप तब्बल १२५००००००००००० रुपये लावण्यास तयार!

Dhule News : धुळे जिल्हा बँकेचा 'कमाल': पीककर्ज वाटपात उद्दिष्ट ओलांडले, राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

SCROLL FOR NEXT