nagar  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : आमिष दाखवून लुटणारी टोळी गजाआड

तो ठिकाणे बदलून बरेच दिवस पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान त्याचा ठावठिकाणा लावण्यात यश आले.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हार - पाच मिनिटांत पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीला लोणी पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून पाच लाख रुपयांची रोकड, गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी व मोबाईल संच हस्तगत केले आहेत.

जितेंद्र ममता साठे (रा. वासुंदे ता. पारनेर) त्याचे साथीदार अरुण सुरेश शिंदे (रा. वरवंडी, ता. संगमनेर), अन्वर अब्दुलखा पठाण (रा. केशवनगर मुंढवा, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. बाबासाहेब वसंत सूर्यवंशी (रा. बळेगाव, ता. वैजापूर ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.

याबाबत लोणी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक युवराज आठरे यांनी सांगितले, की आरोपी जितेंद्र साठे याने शिंदे असे खोटे नाव सांगून तक्रारदार सूर्यवंशी यांना पाच मिनिटात पैसे दुप्पट करून देतो, असे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांना लोणी येथील प्रिन्स कॉर्नर चौकात बोलावून घेतले.

त्यांच्याकडून साडेनऊ लाख रुपये घेऊन हातचलाखीने आरोपींनी रद्दी पेपर असलेली बॅग देऊन त्यांची फसवणूक केली. मुख्य आरोपी जितेंद्र साठे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर आळे फाटा नारायणगाव पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. तो ठिकाणे बदलून बरेच दिवस पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान त्याचा ठावठिकाणा लावण्यात यश आले. साठे याला सविंदणे (ता. शिरूर) येथे रात्रीच्या वेळी ताब्यात घेतले.

पॉलिसी खाक्या त्याने इतर साथीदारांची माहिती दिली. पोलिसांनी तिघांनाही जेरबंद केले. पोलिस अधीक्षक राकेश कोला, अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, शिर्डीचे उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युवराज आठरे, उपनिरीक्षक योगेश शिंदे, जोसेफ साळवी आदींनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT