ahmednagar  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : सराफ बाजारावर आता सीसीटीव्हीची नजर

चंद्रशेखर यादव सुरक्षेसाठी लवकरच सशस्त्र पोलिसांची नेमणूक

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर - शहरातील सराफ बाजाराच्या सुरक्षेसाठी लवकरच सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येईल. त्याचबरोबर २४ तास सशस्त्र पोलिसांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

सराफ बाजारात तीन दिवसांपूर्वी झालेल्या चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यादव यांनी सराफ व्यावसायिकांची बैठक घेतली. याप्रसंगी सराफ संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष वर्मा, नगर शहर सराफ संघटनेचे अध्यक्ष प्रकाश लोळगे, सुभाष मुथा, सुभाष कायगावकर, राजेश मिरांडे, प्रकाश हिंगणगावकर, आनंद मुथा, शिवनारायण वर्मा, रमेश टाकळकर, विजय कुलथे, प्रकाश देवळालीकर आदी उपस्थित होते.

यापूर्वी सराफ बाजारात खासगी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. सराफ व्यावसायिक, कोतवाली पोलिस आणि सिक्युरिटी गार्ड असा एक व्हाट्स ॲप ग्रुप तयार करून त्यावर रात्री गस्त घालणाऱ्या सुरक्षारक्षकांची माहिती घेतली जात होती. मात्र, सुरक्षारक्षकांना त्यांचे पैसे न मिळाल्यामुळे हे काम थांबले होते. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी पुढाकार घेऊ पुन्हा सुरक्षारक्षकांची नेमणूक केली.

सराफ बाजारातील सर्व रस्त्यांवर रात्री सुरक्षारक्षक बॅरिकेडिंग लावतील व सकाळी काढतील. तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये व घडल्यास त्याचा तत्काळ उलगडा व्हावा, यासाठी सराफ बाजारात चांगल्या प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय सराफ व्यावसायिकांनी

बैठकीत घेतला.

व्यावसायिकांना पोलिसांच्या सूचना

दुकानांना आडवे रोलिंग शटर बसवावे

उभ्या शटरला दोन ठिकाणी सेंट्रल लॉक करावे

शटर, दरवाजा व खिडक्यांना सायरनची यंत्रणा बसावी

कॅमेऱ्यांचा डीव्हीआर दिसणार नाही, याची काळजी घ्यावी

दुकानात पूर्ण वेळ सुरक्षारक्षक नेमावा

संशयित व्यक्ती आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी

सराफ बाजारात दिवसा व रात्री सशस्त्र पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. चोरीच्या घटना घडू नयेत, यासाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबत सराफ व्यावसायिकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT