ahmednagar sakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : नगरकरांची घरे तपासणार प्रयोगशाळा

व्हीआरडीईजवळ आर्किटेक्ट संघटनेच्या सहकार्याने ‘स्‍ट्राँगटेक’ची पायाभरणी

गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर - सर्वसामान्यांना अत्याधुनिक आणि सुरक्षित पद्धतीने घर बांधता येणार आहे. या घरकुलासाठी लागणारे सर्व साहित्य प्रयोगशाळेत तपासून घेता येणार आहे. त्या लॅबची पायाभरणी झाली आहे. मेट्रोसिटीतील ही सुविधा लवकरच नगरकरांच्या दिमतीला येणार आहे.

अशास्त्रीय पद्धतीने बांधकाम केल्यास इमारत कोसळण्याची शक्यता असते. अतिवृष्टी, महापूर अशा नैसर्गिक आपत्तीत इमारतींचा पाया खचतो. त्यातून काही इमारती कोसळल्‍याने जीवित आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होते. हे या लॅबमुळे टाळता येणार आहे. घराच्या बांधकामापूर्वी जमिनीखाली किती खोलीवर खडक आहे (जिओटेक्निकल सॉईल इंव्हेस्टिगेशन) याची तपासणी केली जाते. त्यानुसार पायाची खोदाई निश्‍चित करता येते. सर्व बांधकाम साहित्य तसेच यांत्रिकी (मेकॅनिकल) आणि धातू (मेटालॉर्जीकल टेस्ट) तपासण्या केल्या जातील.

आर्किटेक्ट इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स संघटना आणि पुण्यातील स्ट्राँगटेक लॅबच्या वतीने अहमदनगर-दौंड महामार्गावर व्ही.आर.डी.ई. समोर अरणगाव (ता.नगर) शिवारात ही प्रयोगशाळा उभारली जात आहे. प्रसिद्ध आर्किटेक्ट सतीश गुरव यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले.

या होतील तपासण्या

स्ट्रक्चरल ऑडिट, काँक्रिट मिक्स डिझाइन, प्लेट लोड टेस्ट, ई. आर. टी., एन. डी. टी., पाईल मटेरिअल टेस्ट, पाइल डायनामिक टेस्ट, सर्व बांधकाम मटेरियल टेस्ट, सर्व बांधकाम मटेरियल केमिकल टेस्ट, सर्व ॲडमिक्सर टेस्ट, ग्राऊट व मोर्टर टेस्ट, पेविंग ब्लॉक टेस्ट, लाइट वेट ब्लॉक टेस्ट, ब्रिकवरील टेस्ट, बिटुमिन टेस्ट, टाईल्सवरील सर्व टेस्ट, वेल्डिंग टेस्ट, सर्व मेटल टेनसाइल टेस्ट, मेटल हार्ड नेस टेस्ट, सर्व मेटल केमिकल टेस्ट अशा सुमारे तीनशेपेक्षा जास्त टेस्ट लॅबमध्ये उपलब्ध होतील.

बांधकाम क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. नागरिक आणि अभियंत्यांना जमीन, साहित्याचा दर्जा लॅबमुळे समजणार आहे. परिणामी दर्जेदार बांधकाम होईल.

- राजाराम पुजारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्ट्राँगटेक लॅब

बांधकाम व्यावसायिकांनी उभारलेल्या बांधकामावर त्याच्या फर्मचा ब्रॅण्ड होत असतो. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक दर्जाला नेहमीच सर्वोच्च महत्व देतात. या लॅबमुळे ग्राहकांना ही आपल्या बांधकाम व्यावसायिकाने वापरलेल्या साहित्याचा दर्जा समजेल. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहकांमधील पारदर्शीपणा वाढेल.

- प्रदीप तांदळे, सचिव, आर्किटेक्ट इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT