anna hajare  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : अण्णा हजारे यांच्याकडून जितेंद्र आव्हाड यांना नोटीस

एक्सवरील आक्षेपार्ह पोस्टवर हजारे यांनी उत्तर दिले होते. हजारे म्हणाले,

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

पारनेर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा फोटो सोशल मीडियावर टाकत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यावर हजारे यांनी आज वकिलांमार्फत बदनामी केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे.

एक्सवरील आक्षेपार्ह पोस्टवर हजारे यांनी उत्तर दिले होते. हजारे म्हणाले, की माझ्यामुळे देशातील नागरिकांचा भले झाले आहे. माझ्या आंदोलनामुळे जनतेला अनेक चांगले कायदे मिळाले आहेत. मात्र माझ्या आंदोलनमुळे अनेकांना घरी बसावे लागले आहे. हजारे यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर पुन्हा एक्सवर आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले.

त्यात त्यांनी म्हटले आहे की, किमान माझ्या पोस्टमुळे हजारे यांना जाग आली आहे, ही पोस्ट त्यांनी सायंकाळी केली आहे. हजारे यांनी आव्हाड यांना नोटीस पाठविली आहे. त्यात म्हटले आहे की ‘आव्हाड यांनी माफी न मागितल्यास त्यांच्यावर फौजदारी व अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात येईल. हजारे म्हणाले की, ‘मी माझे वकील मिलिंद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. त्यानंतर त्यांनी नोटीस पाठवली आहे’.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT