

Amitabh Bachchan Jalsa bungalow Firing foiled
ESakal
मागील काही दिवसांपासून बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या मुंबई जुहू येथील 'जलसा' बंगला बॉम्बने उडवणार असल्याच्या धमक्या प्राप्त होत होत्या. तसेच या निवासस्थानाबाहेर गोळीबार करण्याचा कट देखील आखण्यात आला होता. या प्रकारानंतर बिग बींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. तथापि आता गोळीबाराचा हा कट उधळण्यात आल्याचे समोर आले आहे. 'बच गए' असे ट्विट करत अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ही माहिती दिली आहे.