ahmednagar  sakal;
अहिल्यानगर

Ahmednagar News : शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू ; अंतरवलीतील घटना वाटसरूमुळे महिलेला जीवदान

आईसह तीन मुले कपडे धुण्यासाठी पाझर तलावर गेले होते.

सकाळ वृत्तसेवा

खर्डा - अंतरवली (ता. भूम) शिवारात असलेल्या एका पाझर तलाव येथे कपडे धुण्यासाठी रुपाली सुरवसे या तीन मुलांसह गेल्या होत्या. या वेळी मुलीचा पाय घरसरल्याने ती पाण्यात बुडू लागली. तिला वाचविण्यासाठी पाण्यात दोन भाऊ उतरले. मात्र तिघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने तीनही जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेत एका वाटसरुमुळे महिलाचा जीव वाचला आहे.

गुरुवार पाच ऑक्टोबर रोजी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. कृष्णा परमेश्वर सुरवसे (वय १६), दीपक ज्ञानेश्वर सुरवसे (वय १६) तर आठवीत शिक्षण घेत असलेली सानिया ज्ञानेश्वर सुरवसे (वय १४) यांचा मृत्यू झाला आहे.

आईसह तीन मुले कपडे धुण्यासाठी पाझर तलावर गेले होते. या वेळी सानियाचा पाय घसरून ती पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी दोन्ही मुले पाण्यात उतरली. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडू लागल्यानंतर आईने मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तीही बुडत असताना तिने आरडाओरडा केल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या भूम तालुक्यातील गिरगाव येथील सरपंचांमुळे महिलेचा जीव वाचला. मात्र तीनही मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. गुरुवारी संध्याकाळी तीनही मुलांच्या पार्थिवावर खर्डा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, या घटनेची माहिती होताच आमदार रोहित पवार, प्रा. मधुकर राळेभात, प्रकाश सदाफुले, सुनील लोंढे, मंगेश आजबे, रमेश आजबे यांनी ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे भेट देऊन सुरवसे कुटुंबियाचे सांत्वन केले.

या घटनेत खर्डा गावचे माजी उपसरपंच भागवत सुरवसे, वडार समाज संघटनेचे अध्यक्ष अध्यक्ष बबलू आण्णा सुरवसे, योगेश सुरवसे, लखन नन्नवरे बिभीषण चौघुले, मयुर डोके, बाबासाहेब डोके, विशाल मुरकुटे यांची मोठी मदत झाली. बिभीषण नामदेव चौघुले यांनी दिलेल्या खबरीवरून जामखेड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT