Vedant Waghmare 
अहिल्यानगर

Vedant Waghmare : आंतरराष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी वेदांत वाघमारेची संघात निवड

सकाळ वृत्तसेवा

नेवासे फाटा : त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचालित श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील विद्यालयाचा इयत्ता दहावीतील विद्यार्थी वेदांत नितीन वाघमारे याची इंटरनॅशनल स्पोर्ट्‌स शूटिंग फेडरेशन आयोजित ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप शूटिंग स्पर्धेकरिता ५० मीटर ३पी रायफल प्रकारात भारतीय संघात निवड झाली आहे.

१२ ते २८ जुलैदरम्यान दक्षिण कोरियामध्ये चँगवान येथे या स्पर्धा होणार आहेत. संघात वेदांत हा वयाने सर्वांत लहान खेळाडू आहे. त्याने आजपर्यंत जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर, तसेच राष्ट्रीय स्तरावर १६ सुवर्णपदके, ३ रौप्यपदके व ५ कांस्यपदके मिळवली आहेत.

नेमबाजी खेळ हा अतिशय महागडा असून, सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्याने खेळामध्ये रुची दाखवत आर्थिक स्थितीवर मात करत कठोर परिश्रमाने आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली आहे.

आज खऱ्या अर्थाने त्याने आपल्या आई-वडिलांचे, प्रशिक्षकांचे स्वप्न पूर्णत्वास नेले. नेमबाजी खेळाचे साहित्य इतरांकडून भाडेतत्त्वावर घेऊन सराव करीत आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोचला आहे. त्याला हे साहित्य घेण्यास मदत मिळाली तर तो देशाचे, राज्याचे तथा जिल्ह्याचे नाव ऑलिंपिकसारख्या स्पर्धेत उज्ज्वल करेल यात शंका नाही, असे त्याचे प्रशिक्षक आवर्जून सांगतात.

या यशाबद्दल त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक साहेबराव घाडगे पाटील, अध्यक्षा सुमती घाडगे पाटील, उपाध्यक्षा स्नेहल चव्हाण, सचिव मनीष घाडगे पाटील, प्राचार्य सोपान काळे, प्राचार्य सचिन कर्डिले, क्रीडा समन्वयक संजयसिंह चव्हाण सर्व विभागप्रमुख, शिक्षक व कर्मचारी यांनी वेदांतचे कौतुक केले.

रायफल शूटिंग प्रशिक्षक छबूराव काळे, किरण खंदारे, राधिका देशमुख यांचे प्रशिक्षण, तसेच अभिजित दळवी, संभाजी निकाळजे, महादेव काकडे, अशोक पानकडे, संदीप वाघमारे, गणेश शिंदे यांचे सहकार्य त्याला लाभत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

IAS Officers Transfers: महाराष्ट्रात पुन्हा मोठी प्रशासकीय उलथापालथ! ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ, कोण कुठे गेलं?

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: इस्लामाबादमधील तिढ्यानंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर तेहरानमध्ये दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

SCROLL FOR NEXT