ration rice seized esakal
अहिल्यानगर

Ahmednagar : रेशनचा ६०० गोण्या तांदूळ जप्त ; निक गुन्हे शाखेची कारवाई

दोन आरोपींसह ५६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

राजेश नागरे

अहमदनगर : बीड येथून मुंबईच्या बाजारात विनापरवाना विक्रीसाठी चालविलेला तब्बल ६०० गोण्या रेशनिंगचा तांदूळ पोलिसांनी पकडला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगर-जामखेड रस्त्यावरील कँटोन्मेंटच्या बंद टोलनाक्याजवळ ही कारवाई केली. याप्रकरणी दोघांना अटक करून त्यांच्याकडून रेशनिंगचा तांदूळ व एक ट्रक, असा एकूण ५६ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

बीड येथून मुंबईतील बाजारात रेशनिंगचा तांदूळ विक्रीसाठी चालविला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली. त्यानुसार आहेर यांच्या पथकाने नगर-जामखेड रस्त्यावरील कँटोन्मेंटच्या बंद पडलेल्या टोलनाक्याजवळ सापळा लावला. यावेळी १४ टायर ट्रकमधून रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याचे निदर्शनास आले.

पथकाने कृष्णा गोविंद ढाकणे (वय ३१) व विवेक रामभाऊ ढाकणे (वय १९, दोघे रा. धनगरवाडी, डोईठाण, ता. आष्टी, जि. बीड) यांना ताब्यात घेतले. ट्रकमध्ये तांदळाच्या गोण्या भरलेल्या दिसल्या. त्यांनी हा माल प्रकाशजी धनराजजी तोतला व पवन प्रकाशजी तोतला (दोघे फरार, रा. वंजार गल्ली, जि. बीड) यांच्या मालकीचा असून, बीड एमआयडीसी येथील महेश गृहउद्योग येथील पत्र्याच्या शेडमधून शासकीय स्वस्त धान्य वितरण योजनेतील ५० किलो वजनाच्या ६०० गोण्या तांदूळ मुंबई येथे विक्रीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली.

गोदामातच काळा बाजार

जिल्ह्यात रेशनिंगच्या धान्याची अनेक गोदामे आहेत. या ठिकाणाहून रेशनचे धान्य वितरित केले जाते. परंतु बहुतांश गोदामांत रेशनिंगच्या गोण्यांतील तांदूळ, तसेच धान्य काढून ते इतर गोण्यांमध्ये भरून त्याची विल्हेवाट काळ्या बाजारात लावल्याचे प्रकार यापूर्वी उघड झाले आहेत. पुरवठा विभागाने वेळोवेळी कारवाया करूनही हा प्रकार थांबण्यास तयार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Trade Deal: मोठी आर्थिक घडामोड! व्हिस्की, लक्झरी कारसह अनेक वस्तू होणार; ग्राहकांना दिलासा मिळणार, पण कधीपासून?

IND vs ENG Women Test : भारताविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; ५ नव्या चेहऱ्यांना संधी

Vegetable Rate Hike : पावसाचे आगमन लांबले; भाजीपाला महागला! आवक ४० टक्क्यांनी घटली; मेथी, भेंडी, पालक, वांगीही तेजीत

Bullet Train: भारतच पुढची बुलेट ट्रेन उभारणार! मुंबईहून पुण्यात अवघ्या ४८ मिनिटांत पोहोचणार; कामाला सुरुवात कधी होणार?

'तो फोनवर घाणेरडं बोलत होता' अमृता खानविलकरने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली...'निनावी नंबरवरून कॉल आला अन्...'

SCROLL FOR NEXT