Sangli Jilha Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सहा संचालकांचा आज फैसला
Sangli Bank Election : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील सहा जागांसाठी उद्या (ता. ३) मिरज मार्केट यार्डातील शेतकरी भवनात मतमोजणी होणार आहे. सकाळी आठपासून आठ टेबलवर मतमोजणी सुरू होईल. त्यासाठी २५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सहा जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात असून, सोसायटी गटातील चार जागांच्या निकालाकडे विशेष लक्ष लागले आहे. जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध विनोद पवार, तासगावमध्ये माजी खासदार संजय पाटील विरुद्ध माजी आमदार सुमनताई पाटील, तर कवठेमहांकाळमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे विरुद्ध टी. व्ही. पाटील यांच्यात काट्याची लढत झाली आहे.
मिरज सोसायटी गटातून खासदार विशाल पाटील यांचे समर्थक अण्णासाहेब कोरे यांचे भवितव्यही ठरणार आहे. एकूण २ हजार ४४६ मतदारांपैकी २ हजार २९७ जणांनी मतदान केले. ९३.९१ टक्के विक्रमी मतदान झाले. बँकेच्या २१ जागांपैकी १५ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत.