ahmednagar nilwande dam water release kelwad farmers beneficiary mp sadashiv lokhande Sakal
अहिल्यानगर

Ahmednagar Nilwande Dam : निळवंडे कालव्यातून पुन्हा पाणी सोडणार - खासदार सदाशिव लोखंडे

निळवंडे कालव्याची पहिली चाचणी झाली. यावेळी केलवड ते दगड - पिंपरी गावातील कालवा मोरीचे काम झालेले नव्हते.

सकाळ वृत्तसेवा

राहाता : निळवंडे कालव्यातून दुसऱ्यांदा पाणी सोडले जाईल, त्यावेळी केलवड परिसरातील शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा होईल. हे पाणी या परिसरात यावे, यासाठी सध्या असलेल्या अडचणी तातडीने दूर केल्या जातील. बांधकामासाठी आवश्यक असलेल्या पाच लाख रुपयांचा निधी देखील दिला जाईल, असे आश्वासन खासदार सदाशिव लोखंडे यांनी केलवड येथील ग्रामस्थांना दिले.

निळवंडे कालव्याची पहिली चाचणी झाली. यावेळी केलवड ते दगड - पिंपरी गावातील कालवा मोरीचे काम झालेले नव्हते. त्यामुळे या भागात पाणी आणता आले नाही. या मागणीसाठी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने लोखंडे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी या गावात जाऊन ग्रामस्थांसमावेत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले.

लोखंडे म्हणाले की, ठेकेदार नक्की न केल्याने येथील मोरीचे काम अपूर्ण राहिले. पाणी न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले. मात्र त्यातून आपण मार्ग काढला आहे. जिल्हाधिकाऱ्यां सोबत संपर्क साधून पाच लाख रुपये या कामासाठी वर्ग करण्याची सूचना केली आहे. या भागात पाणी आल्यानंतर येथील दोन तलाव भरून देण्यासाठी मागणी पूर्ण केली जाईल.

हे गाव निळवंडे संघर्षात सुरवातीपासून आघाडीवर आहे. त्यामुळे आपण समक्ष येथे येऊन गावकऱ्यांसोबत संवाद साधला. निळवंडे संदर्भातील ग्रामस्थांच्या सर्व मागण्या आपण पूर्ण करणार आहोत. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे, शाखा अभियंता विवेक लव्हाट, गंगाधर गमे, सरपंच दीपक कांदळकर, नानासाहेब शेळके, उत्तमराव घोरपडे यांच्यासह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार सदाशिव लोखंडे यांनी सातत्याने संघर्ष करून निळवंडे धरण व कालव्यांची कामे मार्गी लावली. आता कालव्यात चाचणीनंतर पाणी सोडले की त्याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळाला. याभागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर व्हावी. तसेच शेतीसाठी पाणी मिळावे, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

- कमलाकर कोते, जिल्हाध्यक्ष, शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT